“जराही शरम उरली असेल तर जितेंद्र आव्हाडांनी मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा”

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांच्या वक्तव्यावर राजकारण पेटल्याचं पहायला मिळत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता सर्वांनी टीकेची झोड उठवली होती.

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

ओबीसी समाजाविषयी महाविकास आघाडीच्या मनात असलेला राग जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याने उघड झाला आहे. सरकारने ओबीसीद्रोही चेहरा लपवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, परंतु सत्य कधीही लपत नसते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

ओबीसी समाजाला आरक्षण न मिळवून देणं हे सरकारचं अपयश आहे. हे अपयश खपवण्यासाठी केंद्र सरकारवर टीका केली. मात्र केंद्रावर हे अपयश खपवू न शकल्याने आता राज्य सरकार ओबीसी समाजावर खापर फोडू पाहत आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी आज ओबीसी समाजाविषयी जी गरळ ओकली, त्यातून ओबीसीद्रोही महाविकास आघाडी सरकारचा खरा चेहरा उघड झाला आहे. सत्तेचा माज चढलेले सत्ताधारी आपल्या जबाबदारीतून अंग काढून घेत आहेत.

सरकारला जराही शरम उरली असेल तर जितेंद्र आव्हाड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, असं पाटील म्हणाले आहेत.  सत्तेच्या माजामुळे ओबीसी समजाविषयी असणाऱ्या कर्तव्याचा विसर पडला आहे, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.

स्वत:ला ओबीसी नेते म्हणून घेणारे नेते छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांच्यासारखे नेते देखील आता मुग गिळून गप्प बसले आहेत, तरी देखील ओबीसी समाज शांत राहणार नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

पोलिसांची मुजोरी! प्रवाशाला लाथा मारत बेदम मारहाण, पाहा व्हिडीओ

 पुणे जिल्हा बॅंकेवर अजित पवारांचं वर्चस्व; विजयानंतर म्हणाले, “मला डाऊट होताच तिथं…”

 पंतप्रधान नरेंद्र मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्या महिलेसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार!

आयुक्त चहल आणि सनदी अधिकारी विश्वासात घेत नाहीत- किशोरी पेडणेकर

मोठी बातमी! नितेश राणेंना दिलासा, तूर्तास अटक नाही