पोलिसांची मुजोरी! प्रवाशाला लाथा मारत बेदम मारहाण, पाहा व्हिडीओ

तिरूवनंतपुरम | सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज घडणाऱ्या ताज्या घटना अगदी काही वेळात जगभर पोहोचतात. सकारात्मक आणि नकारात्मक अशा गोष्टींची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळते.

केरळ हे देशातील सर्वात सुशिक्षित राज्य म्हणून ओळखले जाते. पण केरळच्या लोकांमध्ये सुशिक्षितपणा हा त्यांच्या वागण्यातून दिसत नाही. अनेकदा अमानुष प्रकार केरळमधून समोर आले आहेत.

केरळमधील पोलिसांच्या मारहाणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका प्रवाशाला पोलीस वारंवार मारहाण करत आहेत.

केरळ पोलिसांचे लज्जास्पद कृत्य पुन्हा एकदा समोर आले आहे. रेल्वेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला वारंवार लाथा मारत बेदम मारहाण केली.

मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून रोष व्यक्त करण्यात येतोय. हा व्हिडीओ पाहून राज्य पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येतेय.

एका प्रवाशाने हा 20 सेकंदाचा व्हिडीओ आपल्या व्हायरल केला आहे. रेल्वेच्या डब्यात दरवाज्याजवळ बसलेल्या एका व्यक्तीला पोलीस कर्मचारी वारंवार लाथा मारल्यानंतर तो व्यक्ती पोलिसासमोर गुडघ्यावर बसलेला दिसून येत आहेत.

पोलीसांच्या या अमानुष कृत्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना रविवारी मावेली एक्स्प्रेस ट्रेनमधील असल्याचं समजलं आहे. सध्या या प्रकरणाचा तपास चालू आहे.

मारहाण करणारा पोलीस कर्मचारी हा एएसआय आहे. दुसरा कर्मचारी हा कन्नूरवरून चढला आणि तिकीटे तपासू लागला. परिणामी या तिकीट तपासणीदरम्यान हा प्रकार घडला आहे.

दरम्यान, केरळमधील हा प्रकार सध्या सर्व देशभरात चर्चीला जात आहे. कन्नूरचे पोलीस अधिक्षक पी.एलांगोवन यांनी या प्रकरणाचा तपास विषेश शाखेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ –

महत्वाच्या बातम्या-

 पुणे जिल्हा बॅंकेवर अजित पवारांचं वर्चस्व; विजयानंतर म्हणाले, “मला डाऊट होताच तिथं…”

 पंतप्रधान नरेंद्र मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्या महिलेसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार!

आयुक्त चहल आणि सनदी अधिकारी विश्वासात घेत नाहीत- किशोरी पेडणेकर

मोठी बातमी! नितेश राणेंना दिलासा, तूर्तास अटक नाही

नागपूरात ट्रकची बाईकला जोरदार धडक; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ!