मोठी बातमी! महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का

मुंबई | देशात सध्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीवरून वातावरण तापलेलं आहे. चार राज्यात भाजपची तर एका राज्यात काॅंग्रसची सत्ता आहे. अशात भाजप आणि काॅंग्रेस दोन्ही पक्षांसमोर आपापल्या राज्यात सत्ता टिकवण्याचं आव्हान आहे.

देशात विधानसभेचं वातावरण तापलेलं असतानाच राज्यात महापालिका निवडणुकीवरून जोरदार राजकारण पेटण्याची चिन्ह आहेत. अशात नवी मुंबईत नवी राजकीय घडामोड घडली आहे.

महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये सध्या जोरदार वाद चालू आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच नवी मुंबईसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी राजकारण पेटलं आहे.

2019 विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतराच्या घटना घडल्या होत्या. त्यातली नवी मुंबईतील पक्षांतराची घटना प्रचंड गाजली होती. राष्ट्रवादीचे मातब्बर नेते गणेश नाईक यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता.

गणेश नाईक हे नवी मुंबईत प्रस्थ असलेले नेते मानले जातात. त्यांच्या जाण्यानं राष्ट्रवादीला फटका बसला होता. आता याचीच परतफेड राष्ट्रवादीकडून केली जात आहे.

नवी मुंबई महापालिेकेतील तब्बल 9 नगरसेवक लवकरच हातावर घड्याळ बांधणार आहेत. गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक रविंद्र इथापे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली आहे.

नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रावादीला सत्ता स्थापन करण्यासाठी गणेश नाईक यांच्या राजकीय वर्चस्वाला हादरा देणं गरजेचं होतं. परिणामी आता राष्ट्रवादीनं मोर्चेबांधणी करायला सुरूवात केली आहे.

दरम्यान, राजकीयदृष्ट्या महत्त्वाची महापालिका म्हणून नवी मुंबई महापालिकेला ओळखण्यात येतं. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ताधारी ठाकरे सरकार ही महापालिका लढवणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

काळजी घ्या! कोरोनाबाधित रुग्णांवर केलेल्या संशोधनातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर 

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता दीप सिद्धूचा कार अपघातात मृत्यू

“संजय राऊतांवर 420 चा गुन्हा दाखल करा, त्यांनी आम्हाला फसवलंय” 

युक्रेन-रशिया संघर्ष टोकाला! हल्ला होण्याची भीती असताना रशियाने केली ‘ही’ मोठी घोषणा

“ईडीच्या कार्यालयात रोज दही-खिचडी खातो, याच्या बापाचं राज्य आहे का इथं?”