दिल्लीत धक्कादायक घटना! मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | द काश्मीर फाईल्सवरून देशात राजकीय चर्चांना उधाण आलं असताना एक धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाला आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. परिणामी दिल्लीत राजकारण ढवळून निघालं आहे.

भाजप युवा मोर्चातर्फे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला. परिणामी मोर्चामध्ये उपस्थित तरूणांनी केजरीवालांच्या घरावर शाईफेकली आहे.

भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना केजरीवालांच्या घराच्या गेटला भगवा रंगानं रंगवलं आहे. रंग लावून काश्मीरी पंडीतांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांच्या नेतृत्वाखाली तरूणांनी आंदोलन करण्यास सुरूवात केली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

भाजपच्या गुंडांनी केजरीवालांच्या घरावर हल्ला केला आहे. भाजपच्या अधिपत्याखाली असलेली पोलीस यंत्रणा त्यांना रोखू शकली नाही, असा आरोप सिसोदिया यांनी केला आहे.

पाहा ट्विट – 

महत्त्वाच्या बातम्या – 

 Russia-Ukrain War: “युक्रेनला सांगा मी त्यांना पुर्णपणे बर्बाद करेन”; पुतिनच्या धमकीनं जग हादरलं

  मास्कमुक्तीच्या निर्णयाविषयी राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

  नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ; ‘ते’ प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात

  “संजय राऊत, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा आवाज कोणी बंद करु शकणार नाही”

  “भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहे, कारण…”