नवी दिल्ली | केंद्र सरकारने लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (7th Pay Commission) खुशखबर दिली आहे. आज झालेल्या मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्याने वाढ करण्याची घोषणा केली आहे.
सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना 01 जानेवारी 2022 पासून वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. या आर्थिक वर्षातील शेवटची कॅबिनेट बैठक आज झाली. या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
बैठकीत डीएमध्ये 3 टक्के वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन नव्या महागाई भत्त्यासह जमा होईल.
महागाई भत्त्यात वाढीबरोबरच जानेवारी-फेब्रुवारीची थकबाकी देखील दिली जाणार आहे. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचारी आनंदात असल्याचं पहायला मिळतंय.
मोदी सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या घोषणेनंतर 50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.
दरम्यान, AICPI-IW निर्देशांक नोव्हेंबर 2021 मध्ये 0.8% वाढला होता आणि 125.7 वर पोहोचला होता. यानंतर महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होणार असल्याचं स्पष्ट झालंय.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022: “RCB जिंकली तरी मला आनंद होणार नाही”; किंग कोहलीच्या वक्तव्यानं खळबळ
आघाडी सरकारमध्ये काॅंग्रेसचे 25 पेक्षा जास्त आमदार नाराज, उचललं ‘हे’ मोठं पाऊल
मास्कमुक्तीच्या निर्णयाविषयी राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ; ‘ते’ प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात
“संजय राऊत, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा आवाज कोणी बंद करु शकणार नाही”