मुंबईकरांना यंदाही थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करता येणार नाही, पालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | जगावर असलेलं कोरोना महामारीचं (Corona Pendamic) संकट पुन्हा गडद होण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसच्या ‘ओमिक्रॉन’ (Omicron) या नवीन व्हेरिएंटची दहशत सर्वत्र पसरण्यास सुरुवात झाली आहे.

ओमिक्रॉनबाबत जगभरातून भीतीदायक आकडेवारी समोर येऊ लागली आहे. युरोपमध्ये तर ओमिक्रॉननं धुमाकूळ घातला आहे. भारतातदेखील याचा शिरकाव झाला असून तो वेगाने पसरत आहे. भारतात आतापर्यंतओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 400 पार गेली आहे.

मुंबईतही ओमिक्रॉन व्हेरिएंट कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेनं (Mumbai Municipal Corporation) मोठा निर्णय घेतला. मुंबईकरांना यंदाही थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन मुंबईत करता येणार नाही आहे.

कोरोनाची वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता, मुंबई महानगरपालिका आयुक्त (BMC commissioner) यांनी नवीन वर्षाच्या पार्टीवर बंदी घालणारा आदेश जारी केला आहे. यामध्ये खुल्या किंवा बंद ठिकाणी लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. हा आदेश 25 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 पासून लागू करण्यात आला आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन मुंबईत करता येणार नसल्याचं मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं आहे.

31 डिसेंबरपर्यंत मुंबईत जितके नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून येतील त्यांचे सर्वांचे जीनोम सिक्वेन्सिंग केलं जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या निर्णयामुळे जीनोम सिक्वेन्सिंगद्वरे मुंबईतल्या कोरोना रुग्ण वाढीच कारण ओमायक्रॉन आहे का हे या चाचणीतून कळेल, असं सुरेश काकाणी म्हणालेत.

दरम्यान, ओमिक्रॉन हा डेल्टा व्हेरियंटपेक्षा (Delta variant) जवळजवळ तिप्पट वेगाने पसरतो आहे, त्यामुळे केंद्र सरकारनी (Central Government) सर्व राज्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनपूर्वी प्रतिबंध (Covid restriction) लावण्यास सुरुवात झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“…तर राज्य सरकार राज्यपालांविरोधात सर्वोच्च न्यायालयातही जाऊ शकतं” 

फुकट दिलं तर लोकांना वाटतं हरामचा माल आहे, त्यामुळे…- नितीन गडकरी 

डाॅ. रवी गोडसे म्हणतात, “Omicron म्हणजे Nonsense” 

अफगाणिस्तानात महिलांचे हाल; तालिबान्यांनी घातल्या ‘या’ जाचक अटी

लहान मुलांचंही लसीकरण होणार, अशी करा तुमच्या मुलांची नोंदणी