‘माझ्यानंतर उद्धवला साथ द्या’; रामदास कदम यांच्या निरोपाच्या भाषणाची सगळीकडेच चर्चा

मुंबई | राज्याच्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवसापासून गदारोळ पाहायला मिळाला. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये पहिल्या दिवसापासूनच अनेक मुद्द्यांवरून राडा सुरू होता.

अधिवेशनाचा कालचा दिवस हा देवेंद्र फडणवीस, नितेश राणे, भास्कर जाधव आणि सुहास कांदे यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीमुळे चांगलाच गाजला. पण शिवसेना नेते रामदास कदम यांच्या निरोपाच्या भाषणाची जोरदार चर्चा झाली.

विधान परिषदेतून दोन मोठे नेते काल निवृत्त झाले. काँग्रेस नेते भाई जगताप आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी निरोपाचं भाषण दिलं. पण रामदास कदम यांचं अवघ्या सात मिनिटांचं निरोपाचं भाषण चांगलंच चर्चेत राहिलं.

गेल्या काही काळापासून शिवसेनेसोबत सुरू असलेल्या भांडणाचा उल्लेखही रामदास कदम यांनी त्यांच्या भाषणात केला. ‘कधी कधी कुटुंबामध्ये भांड्याला भांडं लागतं’, असं म्हणत राम कदमांनी वाद सावरण्याचा प्रयत्न केला.

मला पक्षानं पुष्कळ दिलं. कुटुंबात मतभेद होतात थोडेसे होतात पण ते तात्पुरते असतात. माझा स्वभाव तसाच आहे, थोडासा कधी कधी चिडतो, असं देखील रामदास कदम म्हणाले.

रामदास कदम यांच्या निरोपाच्या भाषणात त्यांच्या व अनिल परब यांच्या वादाचे पडसाद पाहायला मिळाले. त्या वादावर बोलणं रामदास कदम यांनी टाळलं. पण बाळासाहेबांच्या एका वक्तव्यावर देखील रामदास कदम यांनी भर दिला.

‘माझ्यानंतर उद्धवला साथ द्या’, बाळासाहेबांच्या या वक्तव्यावर कदमांनी भर दिला. तर माझ्याहातून अशी एकही गोष्ट घडणार नाही ज्यामुळे बाळासाहेबांच्या आत्म्याला वेदना होतील, असंही रामदास कदम म्हणाले.

अनेक वर्षे 40-45 वर्ष मला शिवसेनाप्रमुखांच्या सानिध्यात काम करण्याची मला संधी मिळाली. सभापती महोदय मी स्वत:ला भाग्यवान समजतो, अशा भावना रामदास कदम यांनी व्यक्त केल्या.

माझ्या कोकणात जी सिंचनाची व्यवस्था आहे ती दिड टक्केच आहे, अशी खंत रामदास कदम यांनी बोलून दाखवली. कोकणासाठी करू न शकलेल्या कामाचा उल्लेख देखील रामदास कदम यांनी त्यांच्या निरोपाच्या भाषणात केला.

महत्वाच्या बातम्या-

फुकट दिलं तर लोकांना वाटतं हरामचा माल आहे, त्यामुळे…- नितीन गडकरी

काय सांगता?, सिमकार्ड नसेल तरीही मोबाईलवर बोलता येणार; असा असणार नवा iphone

डाॅ. रवी गोडसे म्हणतात, “Omicron म्हणजे Nonsense”

रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला, अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक

“आगामी काळात भाजप स्वबळावर लढणार, कुणीही यावं अन्…”