25 वर्षांपूर्वी बहिणींकडून खुंखार कांड: देशाला हादरवणाऱ्या प्रकरणात मोठी अपडेट समोर

मुंबई | कोल्हापूरात सगळं काही सुरळीत चालू असताना 1996 साली धक्कादायक प्रकार समोर येऊ लागले. कोल्हापूरातील अनेक लहान मुलं गायब होण्याचे प्रकार वाढू लागले होते. (Seema Gavit and Renuka Shinde)

कोल्हापूरात लहान मुलांचं अपहरण होत असल्याचं समोर आलं होतं. एक दोन नव्हे तर तब्बल 40 पेक्षा जास्त लहान मुलांचं अपहरण करण्यात आलं होतं.

पोलीस प्रशासनापासून मुख्यमंत्र्यांची देखील झोप उडाली होती. या प्रकरणाच्या तपासात ज्या धक्कादायक गोष्टी समोर आल्या, त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले होते.

सीमा गावित आणि रेणुका शिंदे या कोल्हापूरमधील या दोन बहिणींनी आपली आई अंजनाबाई गावितच्या मदतीनं विविध भागातून लहान मुलांचं अपहरण केलं होतं.

अपहरण करण्यात आलेल्या मुलांपैकी 9 मुलांची हत्या देखील करण्यात आली होती. या सर्व प्रकारानंतर 2001 साली कोल्हापूर न्यायालयाने दोन्ही बहिणींना दोषी ठरवलं आणि फाशीची शिक्षा सुनावली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात कोल्हापूर न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अपिल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील फाशी कायम ठेवली होती.

त्यानंतर फाशी ऐवजी जन्मठेपेची शिक्षा व्हावी, अशी मागणी या दोन्ही बहिणींनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती.

रेणुका शिंदे आणि सीमा गावित या बहिणींची फाशी विलंबाच्या कारणास्तव अखेर जन्मठेपेत रूपांतरीत झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

दरम्यान, देशाला हादरवणाऱ्या गावत बहिणींना दिलेल्या फाशीच्या शिक्षेला राज्य सरकारने समर्थन देखील दिलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“नानांनी तर हद्दच केली, मालकिणीचा सगळ्यात प्रामाणिक कुत्रा दाखवण्यासाठी…”

“नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा अन् येरवड्यात दाखल व्हावं” 

“शरद पवार साहेबांनी मेट्रोतून चक्कर मारून आणा असा हट्ट केला का?” 

‘इतना झूठ तो टेलिप्रॉम्प्टर भी सह न सका’; राहुल गांधींचा मोदींना टोला 

नाना पटोलेंना अटक होणार?; ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य