मुंबई | भारतीय डाक विभाग सातत्यानं नवीन योजना घेऊन ग्राहकांना त्या योजनांचा लाभ देत असतं. परिणामी पोस्टाच्या योजनांचा लाभ मिळवणारे अनेकजण आहेत. अशात एक योजना सातत्यानं प्रसिद्ध होत आहे.
पोस्ट ऑफिसच अनेक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा पुरवत आलं आहे. अशात आता मोठा फायदा देणाऱ्या दिर्घकालिन आणि लघुकालिन योजना प्रसिद्ध होत आहेत.
दर दिवसाला किंवा दर महिन्याला एखाद्या योजनेत निश्चित रक्कम गुंतवली की मोठा फायदा मिळत असतो. पोस्ट ऑफिसच्या योजनांना सर्व प्रकारचं संरक्षण असल्यानं या योजना अधिक प्रमाणात ग्राह्य आहेत.
चांगल्या व्याजदरासह अनके प्रकारच्या इतर सुविधा असल्यानं योजनेत सहभागी होण्याचं प्रमाण आता वाढलं आहे. सध्या ग्रामीण टपालच्या ग्राम सुरक्षा योजनेला प्रचंड प्रमाणात पसंत केलं जात आहे.
ग्रामिण भागातील महिला आणि असंघटीत कामगारांच्या आयुष्यात एक निश्चित प्रकारची सोय होण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत अनेकांनी या योजनेचा फायदा घेतला आहे.
ग्राम सुरक्षा योजनेत महिन्याला 1500 रूपये जमा केले तर त्याला मुदतीनंतर ग्राहकाला तब्बल 35 लाख रूपये मिळण्याची तरतूद या योजनेमध्ये करण्यात आली आहे.
ग्राम सुरक्षा योजना ही कमीत कमी 19 तर जास्तीत जास्त 55 वर्ष वय असणाऱ्यांसाठी आहे. याचा सर्वाधिक फायदा हा किशोरवयीन मुलांना होत असल्यातं जाणवलं आहे.
ग्राम सुरक्षा योजनेत मासिक, तिमाही, सहामाही, वार्षिक हप्ता भरण्याचे पर्याय आहेत. हप्ता भरण्यात विलंब झाला तर 30 दिवसांचा कालावधी मिळत असतो. परिणामी अनेक अंगानी ही योजना फायदेशीर आहे.
एखाद्या ग्राहकानं वयाच्या 19 व्या वर्षी 10 लाखांच्या योजनेत गुंतवणूक केली तर त्याला मासिक हप्ता हा 55 वर्षाच्या योजनेसाठी 1,515, 58 वर्षांसाठी 1,463 आणि 60 वर्षांसाठी 1,411 रूपये असतो.
दरम्यान, या योजनेच्या शेवटी 60 वर्ष योजनेत गुंतवणूक करणाऱ्याला तब्बल 35 लाख रूपये मिळतात. परिणामी ही योजना फायदेशीर आहे. या योजनेत गुंतवणुक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘लागीरं झालं जी’ फेम अभिनेत्याचा कार अपघातात मृत्यू!
“नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा अन् येरवड्यात दाखल व्हावं”
“शरद पवार साहेबांनी मेट्रोतून चक्कर मारून आणा असा हट्ट केला का?”
‘इतना झूठ तो टेलिप्रॉम्प्टर भी सह न सका’; राहुल गांधींचा मोदींना टोला
नाना पटोलेंना अटक होणार?; ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य