Budget 2022: बजेटशी संबंधित 10 रंजक गोष्टी, ज्या तुम्हालाही माहीत नसतील!

मुंबई | उद्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण लोकसभेत अर्थसंकल्प (Budget 2022) सादर करणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या घोषणेच्या अपेक्षा आहेत. अशातच आता बजेटच्या संबंधित काही रंजक गोष्टी माहित असणं गरजेचं आहे.

भारतातील अर्थसंकल्प पहिल्यांदा 7 एप्रिल 1860 रोजी सादर करण्यात आला. त्यावेळी स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ जेम्स विल्सन यांनी तो सादर केला होता. तर, स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी तत्कालीन अर्थमंत्री षण्मुखम चेट्टी यांनी सादर केला होता.

1955 पर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प इंग्रजी भाषेत सादर केला जात होता. मात्र, नंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने अर्थसंकल्पाचे पेपर्स हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत छापण्याचा निर्णय घेतला.

1950 पर्यंत बजेटची प्रत राष्ट्रपती भवनात छापली जात होती, परंतु ती लीक झाल्यानंतर छपाईची जागा नवी दिल्लीतील मिंटो रोड येथील प्रेसमध्ये हलवली गेली.

1 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2020-21 सादर करताना निर्मला सीतारामन यांनी 2 तास 42 मिनिटांच्या प्रदीर्घ भाषणाचा विक्रम केला. त्यावेळी त्यांनी 2019 सालीचा स्वत:चाच विक्रम मोडला होता.

मनमोहन सिंग यांनी 1991 मध्ये नरसिंह राव सरकारच्या काळात 18,650 शब्दांचं सर्वात मोठं अर्थसंकल्पीय भाषण दिलं होतं. त्यावेळी देशाच्या आर्थिक इतिहासात सर्वात मोठा बदल होता.

सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषण तत्कालीन अर्थमंत्री हिरुभाई मुळजीभाई पटेल यांनी 1977 मध्ये दिलं होतं. त्यांनी केवळ 800 शब्दांचं अर्थसंकल्पीय भाषण दिलं. देशाच्या इतिहासातील सर्वोच्च अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम माजी पंतप्रधान मोराराजी देसाई यांच्या नावावर आहे.

1999 पर्यंत अर्थसंकल्पीय भाषण फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता सादर केलं जात होतं. 1999 मध्ये माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी बजेट सादरीकरणाची वेळ बदलून सकाळी 11 वाजता केली होती.

अरूण जेठली यांनी 1 फेब्रुवारी 2017 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत अर्थसंकल्प हा 1 फेबूवारीला मांडला जातो.

कोरोना काळात 2021-22 चा पेपरलेस अर्थसंकल्प सादर करण्यात आला. 2019 मध्ये अर्थसंकल्प सादर करणाऱ्या इंदिरा गांधींनंतर अर्थसंकल्प सादर करणाऱ्या सीतारामन या दुसऱ्या महिला ठरल्या होत्या.

2017 पर्यंत रेल्वे अर्थसंकल्प आणि केंद्रीय अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केला जात होता. मात्र, त्यानंतर दोन्ही बजेट एकत्र केले गेले.

इंदिरा गांधी सरकारमध्ये यशवंतराव चव्हाण यांनी सादर केलेल्या 1973-74 च्या अर्थसंकल्पाला काळा अर्थसंकल्प म्हटले गेले होते कारण त्या वर्षातील वित्तीय तूट 550 कोटींची होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

लव, सेक्स और धोखा: PUBG खेळताना तरूणीशी झाली मैत्री अन्…

 “लीडर होण्यासाठी कर्णधार असणं गरजेचं नाही”, अखेर किंग कोहलीने सोडलं मौन

“शिवसेनेशी आमची युती होण्याचा प्रश्नच नाही, सोनिया गांधी यांना… “

 ऑनलाईन-ऑफलाईनचा गोंधळ वाढला, विद्यार्थ्यांनी केला शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर राडा

“…तर उद्धव ठाकरे आणि अजित पवारांसमोर मी स्वत: दुकानं फोडणार”