Budget 2022 | अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी निर्मला सितारमण यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

नवी दिल्ली | आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प (Union Budget) मांडायला सुरूवात केली आहे. कोरोना काळाचा मोठा फटका बसल्यानंतरचं हे बजेट देशासाठी अत्यंत महत्वपुर्ण आहे.

संपुर्ण कोरोना काळात ज्या क्षेत्राने देशाच्या अर्थवस्थेला तारलं, त्या शेती क्षेत्राला (Agriculture) बजेटमध्ये मोठ्या अपेक्षा आहेत. त्यानुसार अर्थमंत्री निर्मला सितारमणा यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

जलसिंचन योजनेतून 9 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार. शेतकऱ्यांकडून मोठी धान्य खरेदी करणार, रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार. तेलबियांच्या शेतीला प्राधान्य देणार असल्याचं निर्मला सितारमणा यांनी सांगितलं आहे.

शेतकऱ्यांना डिजिटल सेवा पुरविल्या जातील आणि भारतातील गरिबी निर्मूलनाच्या ध्येयावर जोमाने काम केलं जाईल, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. ड्रोनच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला चालना देणार. 100 गती शक्ती कार्गो टर्मिनस बनवण्यात येणार आहे, असंही अर्थमंत्री म्हणाल्यात.

25 हजार किमी राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी 20 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. जलसंपदा विकास मंत्रालयाच्या मदतीने देशातील 5 मोठ्या नद्या जोडण्याचं कामही केलं जाणार आहे. देशात सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांवर काम सुरू असून गंगेच्या काठावर राहणाऱ्या शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

Budget 2022 | ‘इतके लाख नवे रोजगार निर्माण करणार’; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची मोठी घोषणा 

Budget 2022 | देशाची अर्थव्यवस्था सावरतेय, सामान्यांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न- निर्मला सितारमण 

सर्वसामान्यांना बसू शकतो सर्वात मोठा झटका; ‘या’ गोष्टी महागणार? 

‘…त्यामुळे आम्ही जनावरांसारखे बनतो’; शोएब अख्तरचं खळबळजनक वक्तव्य 

मोठी बातमी! विद्यार्थ्यांना चिथावल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊला पोलिसांकडून अटक