Budget 2022 | विद्यार्थ्यांसाठी अर्थसंकल्पात मोदी सरकारने केल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022 ) सादर करत आहेत. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. यात त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

निर्मला सितारमण यांनी यावेळी अर्थसंकल्पात शिक्षणाक्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 100 चॅनेल्सची घोषणा केली आहे. या चॅनेल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत शिक्षण मिळणार आहे.

कोरोनाकाळात अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. त्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे. विद्यार्थ्यांना ई लर्निंगसाठी टीव्ही, रेडियो आणि डिजिटल मीडियाचा वापर केला जाणार आहे, असं देखील अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी म्हटलं आहे.

अर्थमंत्री शिक्षण क्षेत्राबाबत बोलताना म्हणाल्या की, “शिक्षण क्षेत्राबाबत बोलायचे झाले तर डिजिटल विद्यापीठांची निर्मिती करण्यात येणार असून शाळांमधील प्रत्येक वर्गात टीव्ही लावण्यात येणार आहे.

स्किल इंडिया मिशनच्या माध्यमातून आणि सरकारी योजनांतर्गत कुशल कामगार तयार करण्यासाठी युवाशक्ती बनवंण्याचं काम केलं जाईल. लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन वाढवण्यासाठी सरकारी प्रकल्पांची संख्या वाढवण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं

या अर्थसंकल्पातून भारताला पुढील 25 वर्षांचा पाया मिळेल, असं अर्थमंत्री सितारमण म्हणाल्या. पुढील आर्थिक वर्षात विकास दर 9.2% राहण्याची अपेक्षा आहे. देशाची अर्थव्यवस्था हळूहळू सावरतेय, असं त्यांनी सांगितलं.

आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देत 60 लाख नवे रोजगार निर्माण करणार आहोत, असं त्या म्हणाल्या. 30 लाख अतिरिक्त नोकऱ्या देण्याची क्षमता आहे. सर्वसमावेशक विकास हेच सरकारचं ध्येय असेल, असं त्यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

Budget 2022 | ‘इतके लाख नवे रोजगार निर्माण करणार’; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची मोठी घोषणा 

Budget 2022 | देशाची अर्थव्यवस्था सावरतेय, सामान्यांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न- निर्मला सितारमण 

सर्वसामान्यांना बसू शकतो सर्वात मोठा झटका; ‘या’ गोष्टी महागणार? 

‘…त्यामुळे आम्ही जनावरांसारखे बनतो’; शोएब अख्तरचं खळबळजनक वक्तव्य 

मोठी बातमी! विद्यार्थ्यांना चिथावल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊला पोलिसांकडून अटक