Budget 2024 LIVE l आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यानंतर केंद्रामध्ये स्थापन होणारे नवीन सरकार 2024-25 या आर्थिक वर्षाचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. (Budget 2024 LIVE)
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थसंकल्प 2024 लोकसभेत सादर करणार आहेत. साल 1999 पासून केंद्रीय अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता सादर केला जात असल्याचे दिसत आहे. पूर्वी मात्र अर्थसंकल्प सायंकाळी 5 वाजता सादर (Budget 2024 LIVE) होत असे. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2017 मध्ये पहिल्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. तेव्हापासून अर्थसंकल्प दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जात आहे.
Budget 2024 LIVE l तुम्ही थेट प्रक्षेपण कुठे पाहू शकता? :
तुम्ही देशातील कोणत्याही वृत्तवाहिनीवर बजेटचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. तसेच दुपारी 4 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पत्रकार परिषद होईल आणि संध्याकाळी 5.30 वाजता डीडी वाहिनीवर अर्थमंत्र्यांची मुलाखत होईल. बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजावरील कर सवलतीच्या मर्यादेत वाढ, महागाईपासून दिलासा, स्वस्त घरे, गृहकर्जाच्या व्याजदरात कपात, रोजगाराबाबत यासह काही मोठ्या घोषणा अपेक्षित आहेत. यासह यंदाच्या अर्थसंकल्पातून स्टँडर्ड डिडक्शन वाढवण्याची अपेक्षा आहे. स्टँडर्ड डिडक्शन सध्या 50 हजार रुपये आहे ती वाढवून 1 लाख रुपये करावी अशी अपेक्षा आहे. (Budget 2024 LIVE)
महिलांसाठी या घोषणा होणे अपेक्षित :
– महिलांसाठीच्या बजेटमध्ये वाढ करता येईल. गेल्या 10 वर्षांत वाटप 30% वाढले आहे.
– थेट रोख हस्तांतरणासारख्या योजना महिलांसाठी शक्य आहेत.
– महिलांसाठी कौशल्य विकास योजना शक्य आहे.
– महिला शेतकऱ्यांसाठी सन्मान निधी 12 हजार रुपयांपर्यंत असू शकतो.
– मनरेगासाठी महिलांना विशेष आरक्षण आणि उच्च मानधन मिळण्याची अपेक्षा आहे.
– महिलांना बिनव्याजी कर्ज दिले जाऊ शकते.
Budget 2024 LIVE l अर्थसंकल्प कसा तयार केला जातो?
अर्थसंकल्प सादर करण्याच्या 6 महिने आधीपासून म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबरपासून अर्थसंकल्प तयार करण्यास सुरुवात केली जाते. ही खुप मोठी प्रक्रिया असते. यामध्ये तज्ञांचा सल्ला, नियोजन, अंमलबजावणी या गोष्टींचा समावेश केला जातो.
केंद्रीय वित्त मंत्रालय आणि नीती आयोग, इतर संबंधित मंत्रालयांच्या सल्ल्याने अर्थसंकल्प तयार केला जातो. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर नवे आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी म्हणजेच 1 एप्रिलपूर्वी दोन्ही सभागृहांकडून तो मंजूर केला जातो.
News Title : Budget 2024 LIVE
महत्वाच्या बातम्या –
Ramayan l ‘रामायण’ मालिका पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला! या वाहिनीवर पाहता येणार
RBI Paytm Bank l Paytm बंद झाल्यानंतर अकाऊंटमधील पैशांचं काय होणार?
Today Horoscope lआजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींनी प्रवास करणे टाळावा
How to Use Credit Card l क्रेडिट कार्ड काढताय? तर अशाप्रकारे करा वापर अन्यथा…