SSC Exam Hall Ticket l आज 10वी परीक्षेचे हॉल तिकीट मिळणार? जाणून घ्या हॉल तिकीट कुठे आणि कसे मिळवायचे

SSC Exam Hall Ticket l अगदी काही दिवसांवर दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षा येऊन ठेपल्या आहेत. विद्यार्थीवर्ग परीक्षांची जय्यत तयारी करत आहेत. अशातच आता दहावी, बारावीच्या परीक्षांसंदर्भात (SSC Hall Ticket) एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेसाठी आज 31 जानेवारी रोजी प्रवेशपत्र जारी करण्याची शक्यता आहे. बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाणार आहे. या वेबसाइटवरून (SSC Hall Ticket) तुम्ही शाळेने दिलेल्या लॉगिनचा वापर करून परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

SSC Exam Hall Ticket l दहावी बोर्डाची परीक्षा दोन शिफ्टमध्ये होणार :

जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, महाराष्ट्र बोर्ड एसएससी परीक्षा 2024 ही 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत घेतली जाणार आहे. महत्वाचं म्हणजे दहावी बोर्डाची (SSC Hall Ticket) परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी 11 ते 2 आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी 3 ते 6 या वेळेत परीक्षा होणार आहेत. जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच परीक्षा पार पडणार आहे.

महाराष्ट्र SSC ॲडमिट कार्ड 2024 डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांची लॉगिन माहिती द्यावी लागेल. ज्यामध्ये त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख समाविष्ट आहे. हॉलतिकीटाशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. कोणत्याही विद्यार्थ्याच्या प्रवेशपत्रात काही कमतरता असल्यास तो बोर्ड कार्यालयाशी संपर्क साधून ती दुरुस्त करू शकतो. (SSC Hall Ticket)

SSC Exam Hall Ticket l अशाप्रकारे प्रवेशपत्र डाउनलोड करा :

– महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in ला भेट द्या.
– यानंतर मुख्यपृष्ठावर जा आणि लॉगिन वर क्लिक करा.
– पुढे नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
– अशाप्रकारे तुमच्या स्क्रीनवर हॉल तिकीट दिसेल आणि ते हॉल तिकीट डाउनलोड करा.

CBSE 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा 2024 चे प्रवेशपत्र 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी 2024 पर्यंत जारी केले जाऊ शकते. CBSE बोर्ड परीक्षा 2024 15 फेब्रुवारीपासून होणार आहे. नियमित CBSE विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमधून बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र (SSC Hall Ticket) मिळेल याची विद्यार्थ्यानी नोंद घ्यावी.

News Title : SSC Exam Hall Ticket 

महत्वाच्या बातम्या –

Rule Change 1 February 2024 l तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम! 1 फेब्रुवारीपासून बदलणार हे नियम

Tata Nexon l भारतीय बाजारात ‘या’ कारची सर्वांना क्रेझ!

Bhiksha Mukt Bharat l मोदी सरकारच्या या योजनेअंतर्गत 2026 नंतर देशात एकही भिकारी दिसणार नाही; जाणून घ्या सरकारचा मास्टर प्लॅन

MLA Anil Babar Death l मोठी बातमी! शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे निधन

Today Horoscope l आजचे राशिभविष्य! या राशीला अडथळ्यातून मार्ग काढावा लागेल