RBI Paytm Bank l Paytm बंद झाल्यानंतर अकाऊंटमधील पैशांचं काय होणार?

RBI Paytm Bank l भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पेटीएम बँकेला (PayTM Bank) एक मोठा धक्का दिला आहे. RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. रिझर्व्ह बँकेने 31 जानेवारी 2024 रोजी हा आदेश जारी केला आहे. याशिवाय 29 फेब्रुवारीनंतर सध्याच्या ग्राहकांच्या खात्यात रक्कम जमा करणे थांबवण्याचे आदेशही आरबीआयने कंपनीला दिले आहेत. त्यामुळे आता 29 फेब्रुवारीनंतर सध्या असलेल्या पेटीएम ग्राहकांना बँकेत रक्कम जमा करण्यास मनाई करण्यात आली आहे.

RBI Paytm Bank l नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी :

आरबीआयने आपल्या आदेशात म्हटले आहे की पेटीएम वापरकर्ते 29 फेब्रुवारीनंतर बँकिंग आणि वॉलेट सेवा वापरू शकणार नाहीत. याशिवाय 11 मार्चनंतर कंपनीला नवीन ग्राहक जोडता येणार नाहीत असे आदेश देण्यात आले आहेत. पेटीएम बँकेच्या मदतीने पैसे हस्तांतरित करणाऱ्या वापरकर्त्यांवरही याचा परिणाम होणार आहे. (RBI Paytm Bank)

पेटीएमच्या अधिकृत वेबसाइटनुसार, प्रत्येक महिन्याला नवीन वापरकर्त्यांची संख्या वाढत आहे. कंपनीचा दावा आहे की त्यांचे 300 दशलक्ष म्हणजेच 30 कोटी वॉलेट वापरकर्ते आहेत. त्याचवेळी 30 दशलक्ष म्हणजेच 3 कोटी ग्राहकांनी पेटीएम पेमेंट्स बँकेत बँक (RBI Paytm Bank) खाती उघडली आहेत. याचा सरळ अर्थ असा की याचा थेट परिणाम 30 कोटी पेटीएम वापरकर्त्यांवर होणार आहे. (RBI Paytm Bank)

RBI Paytm Bank l Paytm युजर्स अकाऊंटचं काय होणार?

– जर Paytm बँकेत तुमचं खातं असेल तर नक्कीच तुम्हाला देखील याच टेंशन आलंच असेलच, मात्र RBI ने ग्राहक कोणत्या अडचणीविना Paytm बँकेतून पैसे काढू शकतात हे स्पष्ट केलं आहे.
– याशिवाय तुम्ही पेटीएममधून फास्टटॅग रिचार्ज देखील करु शकत नाही. तर तुम्ही KYC अपडेट केलं नसे तर तुम्ही Paytm FasTAG चा वापर करु शकला नसता.

– जर पेटीएम बँकेत एखादं ENI किंवा स्टेटमेंड पेंडिंग असेल तर तुम्ही ते लवकर पूर्ण करून घ्यावे.
– तसेच यापुढे तुम्ही Paytm बँक खात्यात कोणताही व्यवहार करु शकणार नाही.
– जर तुम्ही UPI पेमेंटसाठी याचा वापर करु शकता. पण यासाठी तुमचं खातं पेटीएम बँक नव्हे तर दुसऱ्या बँक खात्यात असं गरजेचं आहे.

News Title : RBI Paytm Bank News

महत्वाच्या बातम्या – 

Today Horoscope lआजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींनी प्रवास करणे टाळावा

How to Use Credit Card l क्रेडिट कार्ड काढताय? तर अशाप्रकारे करा वापर अन्यथा…

SSC Exam Hall Ticket l आज 10वी परीक्षेचे हॉल तिकीट मिळणार? जाणून घ्या हॉल तिकीट कुठे आणि कसे मिळवायचे

Rule Change 1 February 2024 l तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम! 1 फेब्रुवारीपासून बदलणार हे नियम

Tata Nexon l भारतीय बाजारात ‘या’ कारची सर्वांना क्रेझ!