अर्थमंत्र्यांचं 162 मिनिटांचं भाषण… गुंतवणूकदारांच्या 3. 6 लाख कोटी रूपयांना झटका!

नवी दिल्ली |  मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील दुसऱ्या अर्थसंकल्पाने शेअर बाजाराला चांगलंच निराश केलं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020-2021 वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज संसदेत मांडला. अर्थमंत्र्यांनी इनकम टॅक्स स्लॅबमध्ये बदल केले. त्याबरोबर कंपनीवरचा DDT (dividend distribution tax) देखील रद्द केला. गुंतवणूकदारांना LTCG आणि STT वर अपेक्षा होत्या. परंतू सरकारने याच्या घोषणा न केल्याने बाजाराचा मूड बदलला. त्यामुळे शेअर बाजारात जोरदार घसरण झाली. शेवटी सेन्सेक्स 8. 8 अंकांनी घसरून 39,735.53 च्या पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी 318 अंकांनी घसरली. यामुळे गुंतवणूकदारांच्या 3. 6 लाख कोटी रूपयांना झटका बसला.

बाजारात गेल्या 10 अर्थसंकल्पातीमधील यावेळेस सर्वात मोठी घसरण दिसून आली. मोदी सरकारच्या पाठीमागच्या 6 अर्थसंकल्पाच्या दिवसांपैकी 4 अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजारात घसरण होती. तरीदेखील गेल्या वर्षी 1 फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात सेन्सेक्स 0.6% टक्के वाढला होता.

अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या बजेटने गुंतवणूकदारांना निराश केलं. आजच्या अर्थसंकल्पाच्या दिवशी विशेष करून गुंतवणूकदारांना चांगलाच झटका बसला. शनिवारी (आज) गुंतवणूकदारांचं 3.6 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय.

दुसरीकडे, सर्वसामान्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारं हे बजेट आहे, अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. तर दशकातला हा सर्वोत्तम अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मोठमोठे आकडे दाखवून दिशाभूल करण्याच्या प्रयत्न; अर्थसंकल्पावर जलीलांची टीका

-देशाच्या शेतीचं आकारमान केवढं??… तरतूद किती कमी करताय; राजू शेट्टी अर्थसंकल्पावर नाराज

-“LIC विकल्यानंतर तुम्ही काय विकणार आहात??… आता आपल्याला आपली LIC वाचवावी लागेल”

-मोहम्मद शमी सध्याच्या घडीचा जगातला सर्वोत्तम गोलंदाज; शोएब अख्तरची स्तुतीसुमनं

-आता मोबाईलप्रमाणेच वीजेसाठीही प्रीपेड सुविधा; मोदी सरकारचा मोठा निर्णय