मोठमोठे आकडे दाखवून दिशाभूल करण्याच्या प्रयत्न; अर्थसंकल्पावर जलीलांची टीका

नवी दिल्ली | केंद्रातील नरेंद्र मोदी 2.0 सरकारने येत्या आर्थिक वर्षासाठीचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. भाजप नेत्यांनी हा दशकातील सर्वांत चांगला अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं आहे. तर विरोधी पक्षांनी हे बजेट अत्यंत निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आजचं बजेट म्हणजे मोठमोठे आकडे दाखवून दिशाभूल करण्याच्या प्रयत्न असल्याची टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

भाजपला सत्तेत येऊन जवळपास 6 वर्षे झाली. त्यांनी 6 वर्षाच्या कार्यकाळात काय काम केली आहेत? हे सर्वांनाच माहिती आहे. आज शेतीची अवस्था काय आहे? रूग्णालयांची अवस्था काय आहे? हे सुद्धा सर्वांना माहिती आहे. हे सगळं बदलण्याकरिता आजच्या अर्थसंकल्पातून काहीतरी होईल, असं वाटतं होतं मात्र अर्थसंकल्प ऐकल्यानंतर माझी साफ निराशा झाली, असं जलील म्हणाले आहेत.

अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी आकडे असे दाखवले आहेत की सर्वसामान्यांना असं वाटायला पाहिजे की सरकार किती चांगलं काम करतंय. पण ग्राऊंड लेव्हलला काय चालतं आणि काय होतं हे सगळ्यांना माहितीये, असंही ते म्हणाले.

दरम्यान, आजचा अर्थसंकल्प म्हणजे एक जुमला बजेट प्रेझेंटेशन आहे, असा शेलक्या शब्दात त्यांनी अर्थसंकल्प मांडणाऱ्या अर्थमंत्र्यांचा आणि सरकारचा समाचार घेतला.

महत्त्वाच्या बातम्या-

-देशाच्या शेतीचं आकारमान केवढं??… तरतूद किती कमी करताय; राजू शेट्टी अर्थसंकल्पावर नाराज

“LIC विकल्यानंतर तुम्ही काय विकणार आहात??… आता आपल्याला आपली LIC वाचवावी लागेल”

-मोहम्मद शमी सध्याच्या घडीचा जगातला सर्वोत्तम गोलंदाज; शोएब अख्तरची स्तुतीसुमनं

-आता मोबाईलप्रमाणेच वीजेसाठीही प्रीपेड सुविधा; मोदी सरकारचा मोठा निर्णय+

-बेरोजगारीचं काही करणार आहात की नाही?? सरकारच्या अर्थसंकल्पावर राहुल गांधी तुटून पडले!