सावधान! ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कॉल करताय?; एकदा ही माहिती वाचा अन्यथा खिशाला लागू शकते कात्री!

मुंबई|  लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. त्यामुळे काम करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग या पर्यायाकडे अनेकजण वळले आहे. सोशल डिस्टंसिंगचे भान ठेवून अनेकजण गाठी भेटी होण्यासाठी व्हिडीओ कॉलचा वापर करत आहेत. झूम, वेबक्स, ब्लू जीन्स यासारख्या अनेक विनामुल्य व्हिडीओ कॉल अँपचा वापर लोक करत आहेत. पण या कंपन्यांमध्ये झालेले बदल  ग्राहकांना महागात पडणार आहे.

आजकाल शाळा कॉलेजला हजेरी लावण्यासाठी, विद्यार्थी नातेवाईकांच्या गाठी भेटी होण्यासाठी झूम, वेबक्स, ब्लू जीन्स या अँपचा वापर करताना शुल्क आकारण्यात येत असून ग्राहकांची फसवणूक होत आहे.

व्हिडीओ कॉल दरम्यान ऑनलाईन नेटवर्किंगमध्ये अडथळा येत असेल तर कनेक्ट टू ऑडिओ असं ऑपशन येत त्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर वेगवेगळे नंबर दिसतात. कॉलमध्ये व्यस्त असल्याने ग्राहक ते नंबर कोणत्या देशाचे आहे हे न तापसताच क्लिक करतात. पुन्हा आयडी पासवर्ड टाकून व्हिडिओ कनेक्ट करून सहभाग घेतात, याच पर्यायामुळे व्हॉइस कॉलचे बिल आकारणी लागू होते.

दरम्यान,  निष्काळजीपणे केलेले क्लिक ग्राहकांना महागात पडू शकतं, यासाठी देशात होणाऱ्या मिटिंगचा स्थानिक क्रमांक उपलब्ध करून देण्याची सक्ती या कंपन्याना केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाची लस बाजारात आणणारं रशिया ठरलं पहिलं राष्ट्र!

48 तासात संजय राऊत यांनी माफी मागावी अन्यथा…; सुशांतच्या भावाची राऊतांना नोटीस

‘सुशांतला हॉटेलमध्ये दिसलं होतं भूत…’; रियाने पोलिसांना सांगितली ‘त्या’ दिवशीची हॉटेलमधील कहानी!

“…म्हणून उद्धव ठाकरे, तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल”

मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती गंभीर, चाहते चिंताग्रस्त