’48 तासात संजय राऊत यांनी माफी मागावी’; सुशांतच्या भावाने पाठवलेल्या नोटीसवर संजय राऊत म्हणाले…

मुंबई | सुशांत सिंहच्या वडिलांनी केलेल्या दुसऱ्या लग्नामुळे तो नाराज होता. सुशांत सिंह राजपूत आणि त्याचे वडिल के. के. सिंह यांच्यातील नातं फारसं चांगलं नव्हतं, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं होतं.  यावर केलेल्या या लेखामुळे  48 तासात माफी मागावी अशी मागणी सुशांतचा भाऊ नीरज कुमारने केली होती. यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सुशांतच्या कुटुंबाची काय मागणी आहे याची कल्पना नाही. जर चूक झाली असेल तर विचार करावा लागेल. जी माहिती आहे त्यावरुनच मी बोलत असलाचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

सुशांत सिंह प्रकरणावरुन राजकारण करण्याची ही वेळ नाही. राजकारण न करता देश पुढे जावा ही आमची स्पष्ट भूमिका आहे. सुशांत सिंहला न्याय मिळो अशी माझी प्रार्थना असल्याचं  संजय राऊत यांनी सांगितलं. यावेळी बोलाना त्यांनी थेट केंद्रावरही निशाणा साधला.

दरम्यान, सुशांत सिंह प्रकरणावरुन महाराष्ट्र सरकार अजिबात अस्थिर नाही. अशा प्रकरणांमुळे सरकार अस्थिर होऊ लागली तर आधी केंद्रातील सरकार पडेल, असं  राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

…तर आधी केंद्रातलं सरकार पडणार; सुशांत सिंहच्या प्रकरणावर राऊत यांचं मोठं वक्तव्य!

पुण्यातील सख्ख्या मावशीने पुतणीला वेश्या व्यवसाय कर म्हणत तिच्यासोबत केलं ‘हे’ संतापजनक कृत्य

कोरोनाची लस बाजारात आणणारं रशिया ठरलं पहिलं राष्ट्र!