‘या’ बड्या अभिनेत्यावर गुन्हा दाखल, महिला रायटरची केली फसवणूक?

मुंबई | बॉलिवूडमधील कलाकार वादाच्या घेऱ्यात सापडला नसेल, असं क्वचितच घडलं असेल. बॉलिवूडमधील अनेक कलाकार सतत कोणत्या न कोणत्या वादात सापडत असतात. सध्या बॉलिवूड मधील आणखी एका कलाकार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

अभिनेता रणदीप हुडावर सध्या एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. प्रियंका शर्मा असं या महिलेचं नाव आहे. प्रियंका एक स्क्रिप्ट रायटर आहे. रणदीप हुडा आणि त्याच्या टीमने आपली फसवणूक केल्याचा आरोप प्रियंकाने केला आहे. याप्रकरणी तिने हरियाणा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

प्रियंकाने रणदीपवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. हरियाणा पोलिसांकडून याप्रकरणी रणदीपला नोटीस बजावण्यात आली आहे. हिसार अधिवक्ता रजत किसान यांनी याविषयी माहिती दिली आहे.

प्रियंका सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून रणदीपच्या संपर्कात आहे. तिने सोशल मीडियावरुन अनेक गाणी आणि स्टोरीज रणदीपला सेंड केल्या आहेत. रणदीपने लवकरंच आपण या प्रोजेक्ट्सवर काम सुरु करु, असं आश्वासन प्रियंकाला दिलं होतं.

प्रियंकाने रणदीपसह त्याच्या टीमला आत्तापर्यंत 1200 गाणी आणि 40 स्टोरीज सेंड केल्या आहेत. कित्येक वर्ष लोटून गेली तरी देखील अद्याप रणदीपने यावर काम सुरु केलं नाही. यानंतर जेव्हा प्रियंकाने या स्क्रिप्ट माघारी पाठवण्यास सांगितलं, तेव्हा रणदीपने तिला जिवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप प्रियंकाने केला आहे.

प्रियंकाने याप्रकरणी रणदीपकडे 10 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. प्रियंकाने म्हटल्याप्रमाणे गेल्या आठ वर्षांपासून तिची फसवणूक होत आहे. ती सातत्याने रणदीपला यावर उत्तर मागत होती. मात्र, तो काहीच बोलत नव्हता.

दरम्यान, याप्रकरणी रणदीपने अद्याप काहिही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच त्याने अद्याप हरियाणा पोलिसांच्या नोटीसला देखील उत्तर दिलं नाही. रणदीप या प्रकरणावर काय बोलणार, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

अभिषेकच्या ‘या’ गोष्टीवर आहे ऐश्वर्याचं प्रेम, म्हणूनच केलं बीग बींच्या मुलाशी लग्न

…म्हणून कियारा ‘शेरशाह’ चित्रपटात डिंपलची भूमिका साकारल्यानंतर रडली होती; वाचा सविस्तर

इंदिरा गांधींची भूमिका साकारणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचे वडील होते इंदिरा गांधींचे खासगी पायलट

जिममध्ये तरुणावर अदृश्य शक्तीने केला हल्ला अन्…; हलक्या काळजाच्या लोकांनी व्हिडीओ पाहू नका

सीतेच्या भूमिकेसाठी करीनाने 12 कोटी रुपये मागितले का? करीना मौन सोडत म्हणाली…