मुंबई एसी लोकल आंदोलन: प्रवाशांसाठी प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई | मुंबईत साध्या गाड्यांच्या (Non AC Local) फेऱ्या कमी करुन त्याजागी एसी लोकलच्या (AC Local) फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य चाकरमाणी संतापले आहेत. त्यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

एसी लोकलच्या फेऱ्या वाढविल्याने प्रवाशांनी कळवा (Kalwa) आणि बदलापूर (Badlapur) रेल्वे स्थानकात आंदोलन केले. यावेळी त्यांनी कळवा कारशेडमधून सुटणारी एक लोकल अडवून धरली होती.

त्याची दखल घेत मध्य रेल्वेने (Central Railway) काही ठोस भूमिका घेतली आहे. एसी लोकलच्या जादा फेऱ्या रद्द करुन पुन्हा साध्या गाड्या सोडण्याचा निर्णय उद्यापासून (दि. 26) घेण्यात आला आहे.

दुपारी 12:27 आणि 01:48 ला सुटणाऱ्या एसी लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन त्यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली.

दरम्यान, प्रवाशांच्या मागणीनुसार 19 ऑगस्ट पासून 10 एसी लोकल सुरु करण्यात आल्या होत्या. पण, ऑगस्ट 25 पासून या एसी लोकल साध्या एसी लोकल म्हणून धावतील अशी घोषणा मध्य रेल्वेने केली.

एसी लोकल कमी झाल्याने सामान्य अथवा साध्या लोकल गाड्यांचे वेळापत्रक आणि फेऱ्या कोलमडल्या होत्या. त्यामुळे स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. आणि प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता.

बदलापूर स्थानकात मागील तीन दिवस प्रवाशांचे आंदोलन सुरु होते. एसी लोकल बंद करण्यासाठी त्यांनी स्टेशन मास्तारांच्या कार्यालयाला घेराव घातला होता. त्यांनी आंदोलन केले होते.

काल (दि. 24) रोजी कळवा मुंब्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर मध्यम मार्ग काढण्याचे आवाहन त्यांनी संबंधितांना केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरील सीबीआय तपासात नवीन माहिती समोर

“माझे मंत्रिपद गेले तरी मला काही फरक पडत नाही” – गडकरींच्या भाषणाची चर्चा जोरात

“गुवाहाटी आणि सुरतला तुम्ही काय काय चाळे केले, हे भविष्यात…” अमोल मिटकरींचा पलटवार

“सावरकरांचा अपमान करणाऱ्या बाईला केतकी चितळेसारखी अटक होणार का?” – अभिनेते शरद पोंक्षे

सोनिया गांधी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणार?, अशोक गहलोत म्हणाले