उद्धव ठाकरेंची भाजपवर सडकून टीका, “भाजप पक्ष नाही तर…”

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केल्याने शिवसेना फूटली. त्याचा परिणाम असा झाला की, महाविकास आघाडी सरकार (MVA) कोसळले आणि शिवसेनेला मोठ्या राजकीय बंडाला सामोरे जावे लागले.

या बंडामागे भाजपचा (BJP) हात होता, हे आता उघड झाले आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे संबंध ताणले गेले आहेत. शिवसेना आणि त्यांचे उरलेसुरले नेते भाजपवर सतत टीका करत आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपचा देशात एककलमी कार्यक्रम आहे. दुसऱ्या पक्षातून नेते आणि आमदार खासदार आणा, असे ठाकरे म्हणाले.

दुसऱ्या पक्षातून आमदार खासदार चोरणे हा भाजपचा नेहमीचा कार्यक्रम आहे. तेवढ्याने त्यांचे भागत नाहीत म्हणून दुसऱ्या पक्षातून पक्षप्रमुख चोरा. स्वत:ला स्वप्ने पडत नाहीत तर दुसऱ्याची स्वप्ने चोरा, असे ठाकरे म्हणाले.

तसेच यावेळी बोलताना त्यांनी भाजपला हा पक्ष आहे की चोरबाजार?, असे म्हंटले. त्यांनी भाजप हा राष्ट्रीय पक्ष (National Party) नसून चोरबाजार आहे, असे म्हणत खिल्ली उडवली.

आपली चोरलेली वस्तू चोरबाजारात मिळते का? हे आपण पाहतो. तसेच आमचे चोरलेले आमदार आणि खासदार आता चोरबाजारात मिळतात का, हे पहावे लागेल, असे ठाकरे म्हणाले.

तसेच स्वत:चा विचार नाही, आचार नाही. फक्त सत्ता पाहिजे. काही वाट्टेल ते करु, पण सत्ता पाहिजे, असा उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला.

 

महत्वाच्या बातम्या – 

मुंबई एसी लोकल आंदोलन: प्रवाशांसाठी प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरील सीबीआय तपासात नवीन माहिती समोर

“माझे मंत्रिपद गेले तरी मला काही फरक पडत नाही” – गडकरींच्या भाषणाची चर्चा जोरात

“गुवाहाटी आणि सुरतला तुम्ही काय काय चाळे केले, हे भविष्यात…” अमोल मिटकरींचा पलटवार

“सावरकरांचा अपमान करणाऱ्या बाईला केतकी चितळेसारखी अटक होणार का?” – अभिनेते शरद पोंक्षे