ज्योतिरादित्य शिंदे वेगळा पक्ष काढणार; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत

भोपाळ | मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे आपल्या सदस्य पदाचा राजीनामा सोपवला आहे.

ज्योतिरादित्य शिंदे वेगळा पक्ष काढण्याची शक्यता आहे. ते एक तर भाजपमध्ये दाखल होतील का?, त्यांना राज्यसभेचं तिकीट मिळेल का?, त्यांना केंद्रामध्ये मंत्री केलं जाणार का? असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत, असं काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

काँग्रेससाठी 18 वर्षे काम केल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला. ते आता भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना चांगलाच जोर आला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थक आणि 19 आमदारांनीही राजीनामा दिला आहे.

दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. कमलनाथ यांना मध्य प्रदेशचं मुख्यमंत्रिपद दिल्यापासून ज्योतिरादित्य शिंदे नाराज आहेत.

महत्वाच्या  बातम्या-

-कोरोनामुळं मुकेश अंबानींनी श्रीमंतांच्या यादीतील अव्वल स्थान गमावलं

-काँग्रेसला मोठा झटका! ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस पक्षाला रामराम

-पुण्याच्या दाम्पत्याला कोरोनाची लागण, दोघेही पॉझिटिव्ह- राजेश टोपे

-“आता गणेश नाईकांचा छा… छैया बघायला तयार राहा”

-पुण्यातील आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना