‘संजय राऊत काठावर वाचले, नाहीतर…’; ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य

मुंबई | राज्यसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. संजय राऊत (Sanjay Raut) काठावर वाचले, नाहीतर सगळं उलट झालं असतं, असं त्यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत काठावर वाचले, नाहीतर आणखी उलट झालं असतं. संजय पवार निवडून आले असते आणि संजय राऊत मागे राहिले असते, पण आमचं नशीब चांगलं म्हणून ते वाचले, असं छगन भुजबळ म्हणालेत.

महाविकास आघाडी सरकारचे चारही उमेदवार निवडून यावेत, म्हणून आम्ही प्रयत्नांची पराकाष्टा केली. पण दुर्दैवाने आमच्या चौथ्या उमेदवाराचा पराभव झाला. अर्थातच ज्या काही चर्चा सुरू आहेत, महाविकास आघाडीला धक्का वगैरे, असं काहीही नाहीये, असं भुजबळ म्हणाले.

महाविकासआघाडीने सरकार स्थापन करताना ज्यावेळी बहुमत सिद्ध केलं, तेव्हा आम्हाला 170 आमदारांचा पाठिंबा होता. आता दोन चार मतं इकडे तिकडे झाली आहेत. पण याचा अर्थ हा महाविकास आघाडीला मोठा धक्का नाही, असंही ते म्हणाले.

अपक्षांनी कुठलंही मत कुणालाही दाखवता कामा नये. कागदावर कुठल्याही प्रकारची खूण, बिंदू किंवा वेडीवाकडी रेष असता कामा नये, हे सर्व नियम आम्ही आमच्या आमदारांना समजावून सांगितले होते, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिलाय. पुरेसं संख्याबळ असताना देखील महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“तुमची झोप उडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुरेसे आहेत” 

“106 काय 130 असूद्या पण अनाजी पंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही” 

देवेंद्र फडणवीसांचं एकच वक्तव्य, संजय राऊतांच्या दुखऱ्या जखमेवर ठेवलं बोट 

…तर संजय राऊतांचा पराभव झाला असता; या पोस्टनं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ