‘या’ भागात चक्रीवादळासह मुसळधार पावसाची शक्यता!

नवी दिल्ली | उत्तर अंदमान समुद्रात आता कधीही चक्रीवादळ तयार होऊ शकतं, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय.

इथे कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. 5 मे पर्यंत यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. त्यानंतर 6 मे रोजी चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. यादरम्यान आराकान वादळ किनाऱ्याकडे सरकत आहे.

6 मे रोजी दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे. यानंतर ते पुढे जाईल. हे चक्रीवादळ अतिशय वेगाने ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकेल.

6 मे रोजी दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येईल. इथे वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

वादळाचा परिणाम पश्चिम बंगाल (West Bengal), सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, ईशान्येकडील राज्यांमध्ये दिसून येतो. इथे जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो.

दरम्यान, पूर्व आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये आणि मध्य भारतातील राज्यांमध्ये पाऊस पडला आहे. उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये पावसासह वादळ येऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या- 

पोस्ट ऑफिस विभागात नोकरीची संधी; मिळेल ‘इतका’ पगार 

“साहेब हृदयावर हात ठेवून सांगा…”; संदीप देशपांडे भावूक 

 ‘आगामी निवडणुकीत भाजप 27 टक्के तिकीटे ओबीसींना देऊन समाजाला न्याय देईल’

हनुमान चालीसा प्रकरण! दिलासा मिळाल्यानंतरही रवी राणांची आजची रात्र तुरूंगातच

“1857 च्या युद्धात तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत मी लढलो असेल”