बीड | खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यानंतर आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (chandrakant khire) यांनीही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका आघाडीचा धर्म पाळा. टक्केवारी घेणं आणि 17 कोटींच्या भ्रष्टाचारात राष्ट्रवादीचे बीडचे आमदार जेल मध्ये जाणार आहे, असा इशारा दिला आहे.
बीडमध्ये आयोजित शिवसेना प्रवेशाच्या जाहीर सभेत चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर उपस्थित होते.
बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर हे अधिकाऱ्यांना शिव्या देत आहेत. एकही अधिकारी यापुढे आमदाराचं काम ऐकणार नाही, असं ते म्हणाले.
लिहून घ्या, मी विभागीय आयुक्तांना सांगणार आहे. दिवसभर गुंगीत असणारा माणूस लोकांना शिव्या देतो त्या माणसाला जागा दाखवा, असंही खैरे म्हणाले.
आपापसात मतभेद करायचे नाहीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा नाही. महाविकास आघाडीत आम्ही देखील आहोत, त्यामुळे कुठलाही शिवसैनिकावरील अन्याय सहन केला जाणार नाही, असं चंद्रकांत खैरे यांनी बजावून सांगितलं.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सत्तेला अडीच वर्षे लोटली. मात्र, महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचं सातत्यानं पाहायला मिळत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून सरकार पाच वर्षे टिकेल असा दावा केला जातो. मात्र, तिन्ही पक्षाचे नेते आणि आमदारांकडून एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण सुरुच आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
गुंतवणुकदारांना केलं मालामाल! ‘या’ कंपनीच्या शेअर्समध्ये इतक्या टक्क्यांनी वाढ
मोठी बातमी! ठाकरे सरकारच्या दोन मंत्र्यावर गुन्हा दाखल
“अडीच वर्षांत केवळ अपमान होणार असेल तर साहेबांनी विचार करायला हवा”
मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!