गुंतवणुकदारांना केलं मालामाल! ‘या’ कंपनीच्या शेअर्समध्ये इतक्या टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली | जागतिक घडामोडींसह दैनंदिन बाजारातील व्यवहारांचा परिणाम शेअर बाजारावर होत असतो. सध्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे.

गेल्या काही काळापासून शेअर मार्केटमधील चढ-उताराचा अनेकांना फायदा होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच काही कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना भरघोस रिटर्न दिला आहे.

आपल्याकडील रक्कम योग्य वेळी चांगल्या कंपनीच्या शेअर्ससाठी गुंतवल्यास त्याचा फायदा होत असल्याचं दिसत आहे. परिणामी मार्केटकडं वळणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे.

साखर क्षेत्राशी संबंधित कंपन्यांनी गेल्या वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केल्याचं पहायला मिळत आहे.

धामपुर शुगर मिल्स लिमिटेड या कंपनीने गेल्या वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या शेअरचे भाव 185 रुपयांनी वाढून 525 रुपयांवर पोहोचले आहेत.

केवळ चालू वर्षातच नाही तर मागील दहा वर्षात धामपुर शुगर मिल्स आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने चांगला परतावा देत आलीये.

गेल्या वर्षभरात या कंपनीच्या शेअरचे भाव 185 रुपयांनी वाढून 525 रुपयांवर पोहोचले आहेत. याचाच अर्थ या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात 184 टक्क्यांची वाढ झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  मोठी बातमी! ठाकरे सरकारच्या दोन मंत्र्यावर गुन्हा दाखल

  “अडीच वर्षांत केवळ अपमान होणार असेल तर साहेबांनी विचार करायला हवा”

मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ  

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा! 

“काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार”