“अहो, काळजी नको हे सरकार आपसातील अंतर्विरोध अन् विसंवादातूनच पडेल”

मुंबई : गेल्या दोन वर्षात आधी दुष्काळ आणि मग अतिवृष्टीत लाखो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यांना एका पैशाचीही मदत या कर्जमाफीने दिलेली नाही,तीन पक्षांच्या तीन भूमिका आणि त्यातून निर्माण झालेला विसंवाद हा या सरकारचा पाया आहे. हे सरकार पाच वर्षे काय टिकणार. ते पडण्यासाठी आपसातील अंतर्विरोध पुरेसे आहेत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

मुख्यमंत्र्यांची १०० दिवसांतील काही खास कामगिरीच दिसत नसेल तर त्याचे मूल्यांकन काय करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘वस्तूस्थिती ही आहे की तीन पक्षांमधील अंतर्विरोधातून,विसंवादातून हे सरकार पडेल. आम्ही सरकार पडण्याची वाट पाहतोय असं नाही, ते पाडण्याचे प्रयत्नही आम्ही करणार नाही पण आजच काँग्रेसकडून शिवसेनेची कोंडी केली जात असल्याचं दिसतंय,’ असं पाटील म्हणाले.

शेतकऱ्यांच्या नशिबी फसवी योजना आली.  पूरग्रस्तांना हेक्टरी २५ आणि ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची उद्धव ठाकरेंची आधीची भूमिका तेच विसरले. असा गंभीर आरोप ठाकरे सरकारवर पाटलांनी केला.

महत्वाच्या बातम्या-

-ठाकरे सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यकाळातील 20 महत्वपूर्ण निर्णय; वाचा यादी

-कोरेनाचे थैमान! भारतातील करोनाबाधितांची संख्या पोहचली 30 वर

-जनाची नाही किमान मनाची तरी…; मनसेची उद्धव ठाकरेंवर विखारी टीका

-“ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी सरकार सकारात्मक”

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वगळता कुणीही पत्राला उत्तर दिलं नाही- अण्णा हजारे