कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Kolhapur North Assembly By-Election) भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
अर्ज दाखल करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) माजी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजीतराजे घाटगे देखील उपस्थित होते.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते आणि मंत्री सतेज पाटलांवर निशाणा साधला. बंटी पाटील हा माणस खाणारा माणूस, शिवसैनिकांनी सावध राहावं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटलांनी केलेल्या टीकेला सतेज पाटलांनीही प्रत्युत्तर दिलंय.
शिवसेना-भाजप युती असताना 2019 साली सेनेचे उमेदवार कुणी पाडले? गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या (Shivena) पाठीत खंजीर खुपसला शिवसैनिकांना हे सगळं माहिती आहे, असं म्हणत सजेत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिलंय.
भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याने अशी टीका केली जातेय, ही निवडणूक लावून मोठी चूक केल्याचं दादांच्या लक्षात आलं आहे, असं वक्तव्य सतेज पाटील यांनी केलं.
70 वर्षात काँग्रेसने काय केलं हे सांगायला बिंदू चौकात यायला तयार आहे, असं म्हणत त्यांनी भाजपचं आव्हान देखील स्वीकारलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Corona | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धुमाकूळ; राज्य सरकारनं उचलंल मोठं पाऊल
“काँग्रेसचा उमेदवार भाजपला द्या, मी त्याला आमदार बनवतो”
“नेते भाजपत आल्यावर कारवाया थांबतात कशा?”
The Kashmir Files वर शरद पोंक्षेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
Corona Restriction: मोठी बातमी! केंद्राने कोरोना निर्बंध हटवले; फक्त ‘या’ 2 गोष्टी पाळा