Corona | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धुमाकूळ; राज्य सरकारनं उचलंल मोठं पाऊल

मुंबई | देशातील कोरोना व्हायरसच्या(CORONA) नवीन रुग्णांमध्ये घट झाल्यानंतर लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे, मात्र याच दरम्यान कोरोनाच्या नवीन प्रकाराने देशात दार ठोठावले आहे.

कोरोना विषाणूचे नवीन प्रकार डेल्टा ((Delta) आणि ओमिक्रॉन प्रकारांनी बनलेले आहे. डेल्टा आणि ओमिक्रॉनचा(Omicron) बनलेला डेल्टाक्रॉन(Deltacron) प्रकार भारतात पोहोचला आहे आणि अनेक राज्यांमध्ये प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

आता चौथी लाट (Corona Fourth Wave) महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळेच राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना (Collectors Of Maharashtra) अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत.

आशिया आणि युरोप खंडात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं धुमाकूळ घातलाय. अनेक देशांमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतीये.

केंद्रासह राज्य सरकार अलर्ट मोडवर असल्याचं दिसतंय. संभाव्य धोका लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारनेही हालचाली सुरू केल्या आहेत.

केंद्रानं कोरोनाबाबत खबरदारी घेण्याचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारही अॅक्शन मोडवर आलंय. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन मुंबई महापालिकेनंही तातडीनं पावलं उचलण्यास सुरूवात केलीय. बाहेरगावाहून येणा-या नागरिकांची पालिकेकडून माहिती घेतली जातीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

“काँग्रेसचा उमेदवार भाजपला द्या, मी त्याला आमदार बनवतो” 

“नेते भाजपत आल्यावर कारवाया थांबतात कशा?” 

The Kashmir Files वर शरद पोंक्षेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

Corona Restriction: मोठी बातमी! केंद्राने कोरोना निर्बंध हटवले; फक्त ‘या’ 2 गोष्टी पाळा 

Vaccine: पुण्यातील कंपनीने ‘चोरी’ करून लस बनवली?, तब्बल 7200 कोटींचा खटला दाखल