“मी मुख्यमंत्र्यांना सांगितलंय संजय राऊतांना आवरा”

मुंबई | राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं पहायला मिळत आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून आरोपांची मालिका सुरु असल्याचं पहायला मिळत आहे.

देशात असे चु# लोक खूप आहेत. अशा लोकांना प्रश्न विचारणं शोभत नाही. राजकारण देशातील अशा चु# लोकांना 2024 नंतर संपवून टाकेल. 2024 नंतर देशातील राजकारण अत्यंत पारदर्शक असेल. 10 मार्चनंतर आपल्याला हे समजून येईल, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता.

संजय राऊतांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया सुरु झाल्या आहेत. अशातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांच्या वक्तव्यावरुन टीकास्त्र सोडलं आहे.

संजय राऊतांना आता चौकशी होणार कळल्यामुळे ते सैरभैर झालेत, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंती केली असून संजय राऊत यांना आवरा. त्यामुळे सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांत शाब्दिक चकमक होत असलेली दिसत आहे.

संजय राऊत यांनी वापरलेल्या शिवीच्या भाषेवर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संजय राऊत करत असलेल्या वक्तव्याच्या विरोधात केंद्रीय महिला आयोगाकडे भाजप तक्रार करणार आहे.

दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धाव ठाकरे यांना भेटणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात काही वेगळ्याच हालचाली होत असल्याचं दृष्य आहे. सध्या सगळ्यांच्या नजरा दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या भेटीकडे लागल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

  महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अन् भाजपला शिवसेनेचा जोर का झटका!

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा झटका

“देशात असे चु… भरपूर आहेत, जे 2024 नंतर दिसणार नाहीत” 

वजन कमी करण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा 

‘…तेव्हाच कोरोना महामारीचा शेवट होईल’; WHO प्रमुखांचं मोठं वक्तव्य