मुंबई | मराठी भाषा दिन अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे याची तयारीही काही ठिकाणी सुरु झाल्याचं दिसत आहे.
ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांची 27 फेब्रुवारीला जयंती आहे. या दिवशीच राज्यात मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं आहे.
राज ठाकरे यांनी मराठी भाषा दिवस जोरदार साजरा करण्याचं आवाहन करत आपल्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं आहे.
आपल्या एका महान, गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव त्याच जोरदारपणे साजरा झाला पाहिजे. कारण आपली भाषा आहे म्हणून आपण आहोत, असं राज ठाकरे यांनी पत्रातून म्हटलं आहे.
गौरव दिवस पूर्वीही दिनदर्शिकेत किंवा कॅलेंडरमध्ये होता, परंतु तो दिवस धूमधडाक्यात साजरा करण्याची पद्दत आपण, आपल्या पक्षाने सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरु केली.
मराठी भाषेचा गौरव त्याच जोशात, दिमाखात आपल्या शहरात, गावात, प्रत्येक गावात, प्रत्येक भागात, प्रत्येक प्रभागात, प्रत्येक विभागात जोरात साजरा व्हायला हवा, अशा सूचना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
सर्वांची भाषा मराठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचीही भाषा मराठीच! अशा या मराठी भाषेचा जयजयकार त्याच जोमानं करा. संपूर्ण राज्यात या दिवसाच्या निमित्ताने मराठीमय वातावरण करा, असंही राज ठाकरे यांनी पत्रातून म्हटलं.
लक्षात ठेवा की मराठी भाषकांनी ह्या देशाच्या फार मोठ्या भागावर आपलं राज्य एकेकाळी प्रस्थापित केलं होतं. ह्या भाषेचा वचक संपूर्ण देशात होता. त्यामुळे मराठी भाषा दिनाची उत्सुकता अजून वाढल्याचं दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘चौकशी होणार कळल्यामुळे संजय राऊत सैरभैर झालेत, त्यांना आवरा’
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अन् भाजपला शिवसेनेचा जोर का झटका!
एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा झटका