शरद पवारांसारखं चंद्रकांत पाटलांनीही केलं भरपावसात भाषण, पाहा व्हिडीओ

पुणे | 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भरपावसात भाषण करत अनेकांची मन जिंकली होती. त्या भाषणाचा विधानभा निवडणूक आणि सातारा लोकसभा निवडणुकीवर प्रभाव पडला होता.

आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. आता चंद्रकांत पाटील यांनी भरपावसात भाषण करत शरद पवार यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.

रविवारी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील भाषण करत असताना अचानक पावसाला सुरूवात झाली. तरी देखील भरपावसात चंद्रकांत पाटलांनी आपलं भाषण सुरूचं ठेवलं होतं.

पुणे शहरामध्ये असलेल्या नवी पेठेतील सेनादत्त पोलिस चौकीसमोर असलेल्या चौकाचे नामकरण करण्यात आलं. स्वर्गीय सुरेश आप्पा माळवदकर असं या चौकाचं नामकरण करण्यात आलं आहे. यावेळी चंद्रकांत पाटील संबोधित करत होते.

तसेच यावेळेस चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फलकाचं अनावरण करण्यात आलं. चंद्रकांत पाटील यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पावसाच्या सरी कोसळत असतानाही चंद्रकांत पाटलांनी स्वर्गीय सुरेश आप्पा माळवदकर यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या कार्यक्रमावेळी भाजपचे प्रदेश सचिव आणि पुणे शहर प्रभारी धीरज घाटे, माजी महापौर सरस्वती शेंडगे, नगरसेविका स्मिता वस्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, दोन वर्षापुर्वी शरद पवार यांनी त्यांचे मित्र आणि सद्यस्थितीत सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारार्थ सातारा येथे सभा आयोजित करण्यात आली होती.

त्यावेळेस शरद पवारांनी साताऱ्यासह संपुर्ण महराष्ट्राला आवाहन केलं होतं. शरद पवारांच्या त्या भाषणाचे पडसाद निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळाले होते.

त्यानंतर दोन वर्षांनी तोच प्रकार महाराष्ट्रात घडला आहे. भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, चंद्रकांत पाटलांच्या बाजूला एक व्यक्ती छत्री घेऊन उभी आहे. तसेच मंचावरील मान्यवरांनीही डोक्यावर छत्री धरलेली आहे.

दरम्यान, समाज माध्यमांवर चंद्रकांत पाटील यांचा हा भरपावसात भाषण देतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चंद्रकांत पाटलांच्या या व्हिडीओमुळे  18 ऑक्टोबर 2019 ला शरद पवारांनी केलेल्या त्या भाषणाचाही व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घट; वाचा कारण

मोठी बातमी! जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीकडून भाजपला दे धक्का

‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगणा राणावतला मोठा झटका, आता…

“विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं, ती वेळ…” 

“मोदीसाहेब ज्यांना अशापद्धतीने भेटले ते पुन्हा सत्तेत आले नाहीत”