“काँग्रेसचा उमेदवार भाजपला द्या, मी त्याला आमदार बनवतो”

कोल्हापूर |  कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Kolhapur by election) काँग्रेसकडून (Congress) अधिकृत उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलं आहे.

काँग्रेसकडून जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांचे गेल्यावर्षी निधन झालं होतं. त्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा रिक्त आहे.

या जागेवर आता पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सत्ताधारी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील होता. पण भाजपने निवडणुकीत उमेदवार उतरवल्याने आता ही निवडणूक रंगतदार होणार आहे.

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या ऑफरने खळबळ माजली आहे.

काँग्रेसचा उमेदवार भाजपकडे द्या, आम्ही आमच्या उमेदवराला माघार घ्यायला लावतो आणि जयश्री जाधव यांना आमदार करतो, असा सरळ प्रस्तावच त्यांनी सतेज पाटलांना दिला, अजूनही काही तास शिल्लक असून यावर निर्णय घेण्याचं आवाहन देखील चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

पेट्रोल डिझेल जीएसटीमध्ये आणायला अजित पवार यांचा विरोध आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा फटका बसला असून जीएसटीमध्ये आणल्यास 30 रुपयांनी इंधन स्वस्त होईल, असा दावाही पाटील यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या- 

“नेते भाजपत आल्यावर कारवाया थांबतात कशा?” 

The Kashmir Files वर शरद पोंक्षेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

Corona Restriction: मोठी बातमी! केंद्राने कोरोना निर्बंध हटवले; फक्त ‘या’ 2 गोष्टी पाळा 

Vaccine: पुण्यातील कंपनीने ‘चोरी’ करून लस बनवली?, तब्बल 7200 कोटींचा खटला दाखल

एसटी कर्मचाऱ्यांना धक्का! मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय