“युती झाल्यास काही नेते नाराज नक्कीच होतील, पण…”

मुंबई | विधानसभा निवडणुकीचा तारीख जाहीर झाली त्यानंतर सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं. ते भाजप- सेनेच्या युतीकडे. युती होणार की नाही याबाबत दोन्ही पक्षांमध्ये तळ्यात मळ्यात सुरू असल्याचं चित्र आहे. 

युती झाल्यास काही नेते नाराज नक्कीच होतील. पण कुणीही बंडखोरी करणार नाही. नाराज असणाऱ्यांची समजूत काढण्यासाठी दोन्ही पक्षात सक्षम माणसं आहेत. ती त्यांची समजूत नक्की काढण्यात यशस्वी होतील, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भाजपचंच सरकार सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला.

भाजप शिवसेनेकडून गेल्या काही दिवसांपासून स्वबळावर लढण्यासाठी चाचपणी केली जात आहे. खुलेपणानं युतीचं सरकार येईल असं वारंवार सांगितलं जात असलं तरी दोन्ही पक्ष अस्पष्टपणे स्वबळावर लढण्यास सज्ज होतं आहेत, अशी माहीती आहे. 

दरम्यान, युती झाल्यास कुणाला फायदा होईल आणि नाही झाल्यास कुणाचा तोटा होईल, हे आता लवकरचं स्पष्ट होईल.

महत्वाच्या बातम्या-