“महाराष्ट्राच्या घराघरात दिवाळी साजरा होणार; किमान ‘इतक्या’ जागा मिळणार”

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून उस्तुकता लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असल्याने दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रात नवीन सरकार कोणाचं येईल हे स्पष्ट होणार आहे.

निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर भाजपचे नेते विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुन्हा भाजप महायुतीचं सरकार येणार आहे, असा विश्वास विनोद तावडेंनी व्यक्त केला आहे.

गेल्या पाच वर्षात काय केलं ते येत्या महिनाभर मतदारापर्यंत पोहोचवेल. तसेच किमान 220 जागा मिळतील, असा दावा विनोद तावडेंनी केला आहे.

2014च्या निवडणुकीप्रमाणे यंदाची निवडणुकही एकाच टप्प्यात होणार असून 21 ऑक्टोबर रोजी राज्यात मतदान पार पडणार आहे. त्यानंतर तीन दिवसांनी 24 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

दरम्यान, केंद्रीय निवडणुक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे. हरियाणा विधानसभेची निवडणुकही महाराष्ट्रासोबतच होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-