“नाथाभाऊ तुम्ही आम्हाला सांगा, तुम्ही काल आलात… तूला जायचं तर तू जा…मी नाही जाणार”

मुंबई | नाथाभाऊ, आपल्या तक्रारी आणि व्यथांची दखल घेईन. त्यावर आपण उत्तर काढू, पण भविष्यात सगळं नीट झाल्यावर अपराधी किंवा संकोच वाटेल असे संवेदनशील शब्द वापरु नका, अशी विनंती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांना केली. ते गोपीनाथगडावर बोलत होते.

तुम्ही जाण्याची किंवा स्वतंत्र पक्ष काढण्याची भाषा करु नका, तुम्ही बोला की तू काल आला आहेस, आम्ही पक्षातच राहणार, तू जायचं तर जा, पक्षात राहून संघर्ष करा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

तक्रारी-व्यथा सोडवल्या जातील, भविष्यात पुन्हा अशी वेळ येणार नाही, असं म्हणत पक्षाच्या चुका नाही तर माणसांच्या चुका झाल्या… पक्षावर राग कशासाठी? पक्षावर राग धरू नका, असं ते म्हणाले.

कुटुंबामध्ये भांडण झालं तर आपण रस्त्यावर येऊन भांडत नाही. त्यामुळे तुमचे सगळे प्रश्न नक्की विचारात घेतले जातील, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-