“मी पक्षाच्या विरोधात नाही पण त्यांच्या विरोधात आहे ज्यांच्याकडे पक्ष हाताळण्याची जबाबदारी”

बीड | दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर बहुप्रतिक्षीत स्वाभिमान दिन साजरा झाला. यावेळी पंकजा मुंडे यांच्याबरोबर गोपीनाथगडावर एकनाथ खडसे यांनी देखील हजेरी लावली होती. खडसेंनी पंकजांआधी आक्रमक भाषण करून फडणवीसांवर जोरदार टीका केली. मात्र भाषणानंतरही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीसांना लक्ष्य करणं सोडलं नाही.

मी पक्षाच्या विरोधात नाही पण जे व्यक्ती हे हाताळतात त्यांच्या विरोधात आहे, असं वक्तव्य करत एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. गेल्या 40 वर्षातील राजकीय जीवनातील अनुभव पाहता आताच्या दिवसांतील सर्वात कटू अनुभव मी घेत आहे, अशी खंतही खडसेंनी बोलून दाखवली.

पक्षाची 30 ते 40 वर्ष सेवा केल्यानंतर जर अश्या रितीने फळ मिळत नसेल तर ते योग्य नसल्याचं खडसे म्हणाले. तसंच महाराष्ट्र भाजपचं सध्याचं चित्र महाराष्ट्राच्या लोकांना आवडत नाही आणि पचनी देखील पडत नाही, असंही ते म्हणाले.

दरम्यान, गोपीनाथ गडावरच्या भाषणात खडसेंनी भाजप सोडण्याचे स्पष्ट संकेत दिले. पक्षाविरोधात बोलू नका असा आदेश आहे पण मी पक्षाविरोधात बोलतच नाही. पण सध्याचं भाजपचं चित्र राज्याला आवडत नाही,पंकजा पक्ष सोडणार नाही… पण माझं सोडा…  माझा भरोसा धरू नका, असा इशारा त्यांनी भाजपला दिला.

महत्त्वाच्या बातम्या-