माफ करा चंद्रकांतदादा, मी आज मुक्ती मागतेय- पंकजा मुंडे

मुंबई | आज मी कोणी नाही, माफ करा चंद्रकांतदादा, आज मी कोअर कमिटीची सदस्य सुद्धा नाही. कारण जर माझ्यावर आरोप होत असेल की मी पदासाठी दबाव आणत आहे, तर मी जाहीरपणे कोअर कमिटीच्या सदस्यपदापासून मुक्ती मागत आहे, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीतील गोपीनाथ गडावर स्वाभिमान दिन साजरा करण्यात आला. यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.

खडसेंनी आज मन मोकळं केलं. मन मोकळं नाही केलं की विष बनतं. माझ्या जीवनात अनेक भाषणं केली, पण मागच्या दोन महिन्यात मी बोलले नाही. गेली 2 महिने मी भाषण केलं नाही, असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

दरम्यान,  मी पक्ष सोडणार नाही पण पक्षाला मला सोडायचं असेल तर निर्णय घ्यावा लागेल, असंही पंकजा  मुंडेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-