मुंबई | सध्या राज्यात भाजप नेते एकाहून एक भारी दावे करत आहेत. कधी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा तर कधी आमदारांच्या पक्षांतराचा दावा करत आहेत.
राज्याच्या राजकारणात सदाबहार नेते म्हणून प्रसिद्ध असणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता असाच एक भारी दावा केला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं कामात असतात. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी एकही दिवस सुट्टी न घेतल्याचा दावाही करण्यात आला होता.
चंद्रकांत पाटील यांनी मात्र सर्वापेक्षा वेगळा दावा केला आहे. नरेंद्र मोदी फक्त 2 तास झोपतात आणि 22 तास काम करतात, असं पाटील म्हणाले आहेत.
आपल्या खळबळजनक दाव्यांनी महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देण्याची क्षमता असलेले पाटील सध्या जोरदार चर्चेत आहेत.
सध्या मोदी झोपच लागू नये म्हणून साधना करत आहेत. त्यांच्यावर देशानं जी गुंतवणूक केली आहे ती वाया जाऊ नये म्हणून काम करत असल्याचंही पाटील म्हणाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच पाटील यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार जाऊन भाजपचं सरकार येणार असल्याचा दावा केला होता.
दरम्यान, वैज्ञानिक संशोधनातून हे स्पष्ट झालं आहे की साधारणपणे माणसाच्या शरीराला 6-8 तासांची झोप आवश्यक असते. मग पाटील यांनी असा दावा कसा काय केला, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Weather Update: पुढील 12 तास धोक्याचे, ‘या’ भागात कोसळणार पाऊस
…म्हणून रात्री बारा वाजता खांद्याला बॅग लटकवून रस्त्यावर धावत होता मुलगा, पाहा व्हिडीओ
पेट्रोल डिझेलच्या दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर
‘… तर तिसरं महायुद्ध होणार’; युक्रेनच्या राष्ट्रपतींचं मोठं वक्तव्य
लाईव्ह मॅच सुरू असताना गॅलरी ढासळली अन्…, पाहा धक्कादायक व्हिडीओ