मुंबई | आपल्या भारत देशात सोन्याला खूपच महत्व आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या दागिन्यांना त्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये दररोज चढ-उतार आपल्याला पाहायला मिळतं असतो. महिला मंडळींसाठी सोनं हे खूप जवळची गोष्ट असते.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठी पडझड पहायला मिळत आहे. त्याचबरोबर चांदीच्या किंमती देखील घसरल्या आहेत.
आज सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीला मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा दर कमी झाला. तर चांदी चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे.
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा वायदे भाव 27 रुपयांनी कमी होऊन 51,420 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.
तर चांदीचा भाव 174 रुपयांनी वाढून 68,050 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला. त्यामुळे म
रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर तर होतोच आहे. परंतु, या युद्धाचे पडसाद भारतीय बाजारपेठेवरही उमटताना दिसतायत.
सोनं हा भारतीयांसाठी जिव्हळ्याचा विषय आहे. एक उत्तम गुंतवणुक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे भारतात सोन्यावर विशेष प्रेम असलेलं पहायला मिळतं.
गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगणाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे
महत्त्वाच्या बातम्या –
“30 वर्षांनी तुमच्या मुलींना पण हिजाब घालावा लागेल”; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
Weather Update: पुढील 12 तास धोक्याचे, ‘या’ भागात कोसळणार पाऊस
…म्हणून रात्री बारा वाजता खांद्याला बॅग लटकवून रस्त्यावर धावत होता मुलगा, पाहा व्हिडीओ
पेट्रोल डिझेलच्या दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर
‘… तर तिसरं महायुद्ध होणार’; युक्रेनच्या राष्ट्रपतींचं मोठं वक्तव्य