मुंबई | महाराष्ट्रातील मॉल आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला (Wine Sale) परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयावर भाजपने (BJP) कडाडून टीका केली आहे. सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली.
राज्य सरकारच्या निर्णयाला होत विरोध चिंतेचा विषय नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी शरद पवारांनी सरकारच्या निर्णयावर भाष्य केलं आहे.
सरकारच्या निर्णयाला जर अनेक स्तरातून विरोध होत असेल आणि राज्य सरकारने या संदर्भात निर्णय बदलला तरी त्याचं मला वाईट वाटण्याचं कारण नाही, असंही पवार यांनी स्पष्ट केलं आहे. आता यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.
वाईन आणि दारुमधील फरक मला समजत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच तो समजावून सांगावा. किराणा दुकानांमध्ये वाइन उपलब्ध करण्याच्या निर्णयाला विरोध झाल्यामुळे पवारांना दुःख झालं असलं तरी या निर्णयाच्या विरोधात महिला रस्त्यावर उतरल्यानंतर पवारांना खरं दुःख होईल, असा टोला चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना लगावला आहे.
वाईन म्हणजे दारू नाही सांगणं का काय तमाशा आहे. वाईन ही दारू नसेल तर दारुच्या दुकानावर वाईन शॉप असा बोर्ड लावू नका. त्याच्या जागी अमृत शॉप, नीरा शॉप असं काहीही म्हणाल्या असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.
वाईनचा निर्णय हा मूठभर लोकांचं भलं करण्यासाठी घेतला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेतल्याचं दाखवलं जात आहे. शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी राज्यात गेल्या दोन वर्षांत शेतमालाल चांगला भाव मिळावा यासाठी काय केलं ते सांगा, असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
“हर्बल टोबॅकोच्या अती सेवनाने नवाब मलिक यांच्या मेंदूवर परिणाम झालाय म्हणून ते…”
‘ती इतर पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवू शकते’; ‘या’ जोडप्याने केला अजब करार
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचे ताजे दर
‘तीन कोटी गरीब लखपती झाले’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य
10वी पास तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; परीक्षेशिवाय 561 जागा भरणार