“पंकजा मुंडे यांच्या नावासाठी फडणवीसांनी आणि मी खूप प्रयत्न केले पण…”

मुंबई | राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होत आहे. 9 जून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून भाजपनेआज पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे

गेल्या काही निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलण्यात आल्याचं पाहायला मिळालंय. यंदाही त्यांच्या नावीची जोरदार चर्चा होती, पण त्यांना संधी देण्यात आली नाही.

विधानपरिषदेसाठी भाजपच्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. भाजपने जाहीर केलेल्या यादीत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नावाचा समावेश नाहीये आणि पंकजा मुंडेंसाठी हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.

भाजपकडून यंदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे राज्य सरचिचणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

पंकजा ताईंच्या उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वांनीच प्रयत्न केले पण केंद्राने काही भविष्यातला विचार केला असेल, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, आमच्या पार्टीत आम्ही सर्व जण कोऱ्या पाकीटासारखे असतो. जो पत्ता लिहिल तिकडे जात असतो. राजकीय कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी इच्छा व्यक्त करायची असते पण निर्णय शेवटी संघटना करते. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषदेच्या उमेदवारांचा निर्णय केंद्रातून होतो, असंही त्यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या-

महागाईने त्रस्त सर्वसामान्यांना आता रिझर्व्ह बँकेचा मोठा झटका! 

‘आघाडीचं मतांचं गणित बिघडलं?’; राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर 

मोहम्मद पैगंबरांवरील टीकेमुळे सुरू झालेल्या वादात कंगणाची उडी, म्हणाली… 

महिन्याला 1000 रूपयांची गुंतवणूक करून 2 कोटी जमवा, जाणून घ्या भन्नाट योजना 

“बंगालमध्ये दीदींनी जसं भाजपला गाडलं, ती वेळ आता महाराष्ट्रात आलीये”