कोल्हापूर | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रपती राजवटीबाबत एक वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडी सरकारनं राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची काहीच कारणे शिल्लक ठेवली नाहीत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रपती राजवाट लागण्यासाठीची काहीच कारणे राज्य सरकारने शिल्लक ठेवली नाहीत. राज्यपालांनी याबाबत दे होतंय ते होऊ दे म्हणून बाजू काढली आहे. हे सरकार मात्र राज्यपालांचे अधिकार कमी करत सुटले आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
राज्य सरकारकडून कुलगुरु पदासाठी दोन नावे राज्यपालांना पाठवली जाणार आहेत. राज्यापालांना त्यातील एक नाव निवडावे लागणार आहे. तसंच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री हे प्र-कुलपती असणार आहेत. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यापीठ कायद्यातील दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी अधिवेशानात याबाबत सुधारणा विधेयक मांडले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपती राजवटीबाबत वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी पेपर फुट प्रकरावर देखील भाष्य केलं.
पेपर फुट प्रकरणावर बोलताना ‘एक दोन नाही तर तीन प्रकारचे पेपर फुटले. या सगळ्यांची पाळंमुळं राजकीय वक्तीपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे सीबीआय चौकशीची मागणी लावून धरणार आहोत, असं पाटील म्हणाले.
केंद्रीय मंत्री अमित शहा दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर होते. सहकारातील खूप कळणारा माणूस सहकार विभागाला मिळाला आहे. अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे. विचारलं असता कोण आजारी आहे, कोण जेलमध्ये आहे. राज्यात गोंधळ सुरु आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जनतेसमोर जा. तेव्हा कळेल जनता कुणाला स्वीकारते, असं आव्हान पाटील यांनी राऊतांना दिलंय.
अमित शाहांनी उद्योग पळवल्याचा आरोप सुभाष देसाईंनी केलाय. त्याबाबत विचारलं असता कोणते उद्योग गुजरातमध्ये गेले याची यादी सुभाष देसाई यांनी द्यावी. काही गेले असतील तर त्यांची कारणं आणि उत्तर अमित शाहांचा विभाग देईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
काँग्रेसची मोठी खेळी; ‘त्या’ 12 आमदारांना काँग्रेसचा दे धक्का?
‘लस घेतलेल्या 90 टक्के भारतीयांना….’; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
पॉर्नोग्राफी निर्मितीबाबत राज कुंद्राचा मोठा खुलासा, म्हणाला…
“2019 च्या निवडणुकीत जनतेनं तुम्हाला औकात दाखवून दिली”
“राणे ज्या पक्षात जातात त्यांची सत्ता जाते, तरी फडणवीसांना सांगितलं होतं यांना पक्षात घेऊ नका”