कोल्हापूर | कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत आघाडीत फूट पडण्याची शक्यता आहे. स्वाभिमानीला एक जागा देतो, असं आश्वासन सतेज पाटील यांनी विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करताना दिलं होतं. आता शिरोळची जागा बिनविरोध करण्यासाठी त्यांनी स्वीकृतचा पर्याय दिला आहे.
सतेज पाटील(Satej Patil) यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची फसवणूक केली आहे, असा थेट आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सतेज पाटील यांच्यावर केला आहे.
आयत्या वेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, आता तो खंजीर उलटा फिरवायला वेळ लागणार नाही, असा इशारा राजू शेट्टींनी सतेज पाटील यांना दिला आहे.
या बँकेच्या निवडणुकीवरुन पालकमंत्री सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हे आमने सामने येण्याची शक्यता आहे. सतेज पाटील यांनी आता, शिरोळची जागा बिनविरोध करण्यासाठी स्वीकृतचा पर्याय दिला आहे.
शिरोळमधील उमेदवार काँग्रेस आणि शिवसेनेचे आहेत. त्यामुळे सतेज पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची फसवणूक केली असल्याचा आरोप शेट्टींनी केलाय. याबाबत उद्या दुपारपर्यंत आमचा निर्णय सांगू असं राजू शेट्टींनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापुरचे राजकारण पुन्हा तापलं आहे. आत्तापर्यंत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाली आहे.
बाकीच्या जागांवर निवडणूक होणार हे आता जवळपास निश्चितच झाले आहे. या निवडणुकीमुळे कोल्हापुरातील गट तटाचं राजकारण पाहायला मिळत आहे. मात्र, उद्या राजू शेट्टी नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“सरकारने राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची कोणतीही कारणे शिल्लक ठेवली नाहीत”
काँग्रेसची मोठी खेळी; ‘त्या’ 12 आमदारांना काँग्रेसचा दे धक्का?
‘लस घेतलेल्या 90 टक्के भारतीयांना….’; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
पॉर्नोग्राफी निर्मितीबाबत राज कुंद्राचा मोठा खुलासा, म्हणाला…
“2019 च्या निवडणुकीत जनतेनं तुम्हाला औकात दाखवून दिली”