क्षणात सर्व उद्ध्वस्त झालं, युक्रेनमधील काळजाचा ठोका चुकवायला लावणारा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली | युद्ध कधी रिकाम्या हातानं येत नाही असं म्हटलं गेलंय ते अगदी तंतोतंत रशिया-युक्रेन युद्धाला लागू पडत आहे. रशिया-युक्रेन युद्धाला सुरूवात झाल्यानंतर आता रस्त्यावर विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

रशियन सैन्य आपल्या ताकदीचं प्रदर्शन करत युक्रेनला उद्ध्वस्त करत आहे. युक्रेनमधील प्रमुख शहरांमध्ये रशियन हल्ले वाढले आहेत. जमीनीवरून हल्ला करत असलेल्या युक्रेनला आता हवाई हल्ल्याचा सामना करावा लागत आहे.

युक्रेनची राजधानी कीव शहरापासून 40 किलोमीटर दूर सध्या रशियन सैन्य पोहोचलं आहे. रशियन सैन्य युक्रेनच्या राजधानीवर सर्वात मोठा हल्ला करण्याची तयारी करत आहे. मोठा फौजफाटा घेवून रशिया कीववर हल्ला करणार आहे.

रशियन सैन्य कीव शहरावर हल्ला करण्यासोबत खारकीव या अन्य एका मोठ्या शहरावर हल्ला करत आहे. खारकीव हे देखील एक महत्त्वाचं शहर आहे. सध्या तेथील परिस्थिती नाजूक बनली आहे.

खासकीवमध्ये रशियन सैन्यानं मिसाईलनं हल्ला केला आहे. अचानकपणे मिसाईल हल्ला झाल्यानं सर्वांग सुंदर परिसराचं काही क्षणात एका बंकरमध्ये रूपांतर झालं आहे. सदरिल घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

रस्त्यावरून तुरळक प्रमाणात वाहतूक चालू आहे. एक भली मोठी इमारत दिसत आहे. गाडी जात असतानाच आचानकपणे एक मिसाईल त्या ठिकाणी पडतो आणि होत्याचं नव्हत होतं. हा व्हि़डीओ पाहाताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहात नाहीत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे सध्या कसल्याही परिस्थितीत युक्रेनवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. याचाच भाग म्हणून पुतिन यांनी रशियन अणुबाॅम्ब विभागाला देखील सतर्क राहाण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, रशियन सैन्याविरोधात लढण्यासाठी युक्रेननं आपल्या सामान्य नागरिकांना देखील शस्त्रास्त्र चालवण्याची माहिती दिली आहे. युक्रेनच्या महिला देखील आपल्या देशासाठी लढत आहेत.

पाहा व्हिडीओ –

 

महत्त्वाच्या बातम्या – 

 मोठी बातमी! रशियाविरोधात अमेरिका आक्रमक; उचललं मोठं पाऊल

“चिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटलेले, हे सुद्धा देशाला कळायला हवं” 

पुतिन यांचा अमेरिकेला झटका; घेतला हा मोठा निर्णय 

रशिया-यूक्रेन युद्धाचा मोठा फटका; सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला

‘…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये’; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी