जालना | विरोधकांनी टीका करण्यासाठी सिल्लोडचा औरंगजेब माझ्या मागे लावला, असं खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते.
काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगाच राज्यसभेत आपल्याला मतदान करेल, असा दावा केला होता. याला दानवेंनी प्रत्युत्तर दिलं.
सिल्लोडचा औरंगजेब माझ्या मागे टीका करण्यासाठी भाड्याने लावला, छत्रपतींच्या पाठीमागे औरंगजेब बरा नाही’ असा घणाघात रावसाहेब दानवे यांनी नाव न घेता अब्दुल सत्तार यांच्यावर केला आहे.
दरम्यान, जालन्यात भाजपने महाविकासआघाडी सरकारविरोधात जलआक्रोश मोर्चा काढला. देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यभरातील भाजप नेते जालन्यात दाखल झालेले. औरंगाबादेतील पाणीप्रश्नानंतर आता भाजपने जालना शहरातील पाणी प्रश्नावरचा मुद्दा उपस्थित केला.
दरम्यान, जालना नगर पालिकेला मुख्यमंत्री फडणवीस असताना अंतर्गत पाईप लाईन साठी 129 कोटींचा निधी दिला हा निधी कुठे गेला याचा हिशेब राज्य सरकारने द्यावा, अशी मागणीही दानवेंनी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
“प्रिय अण्णा…. किमान वाढदिवसाच्या निमित्ताने तरी त्यावर बोलाल हीच अपेक्षा”
…तर महिन्याला पाच हजार रुपयांपर्यंत मिळेल पेन्शन; सरकारची भन्नाट योजना
पोरींचा भर रस्त्यात राडा; हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Presidential Election | राष्ट्रपती निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट समोर
पुढील 5 दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता