मुंबई | शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. शेकडो शिवसैनिक आज अयोध्येत दाखल झाले असून शिवसेना नेत्या दीपाली सय्यद देखील अयोध्येत पोहोचल्या आहेत.
अयोध्येत पोहोचल्यानंतर दीपाली सय्यद यांनी एका वृत्तवाहिनीशी बातचित केली. यावेळी दीपाली सय्यद यांनी अयोध्येतून हिंदुत्वावर भाष्य केलं आहे.
यावेळी बोलताना शिवसेनेचं हिंदुत्व असली असल्याचं दीपाली सय्यद यांनी ठणकावून सांगितलं आहे. तर दीपाली सय्यद यांनी आणखी एकदा मनसेला डिवचलं आहे.
फक्त शिवसेनेचंच हिंदुत्व असली आहे, असं वक्तव्य दीपाली सय्यद यांनी केलं आहे. तर राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरूनही दीपाली सय्यद यांनी टोलेबाजी केली आहे.
आपणच दौरा घोषित करायचा आणि स्वत:च तो रद्द करायचा असं म्हणत दीपाली सय्यद यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. तर हिंदुत्वाचा पताका आपल्याच खांद्यावर असल्याचं भासवायचं हे योग्य नाही, असंही दीपाली सय्यद म्हणाल्या.
आदित्य ठाकरे थोडाच वेळात अयोध्येतून पत्रकार परिषद घेत आहेत. आदित्य ठाकरेंसह खासदार संजय राऊत, शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे, दीपाली सय्यद यांच्यासह अनेक शिवसेना नेते व कार्यकर्ते उपस्थित आहेत.
दरम्यान, दीपाली सय्यद यांनी आणखी एकदा हिंदुत्वावर भाष्य केलं असून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून मनसेला डिवचलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रावसाहेब दानवेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले ‘विरोधकांनी माझ्या मागे….’
“प्रिय अण्णा…. किमान वाढदिवसाच्या निमित्ताने तरी त्यावर बोलाल हीच अपेक्षा”
…तर महिन्याला पाच हजार रुपयांपर्यंत मिळेल पेन्शन; सरकारची भन्नाट योजना
पोरींचा भर रस्त्यात राडा; हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Presidential Election | राष्ट्रपती निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट समोर