सर्वात मोठी बातमी! पुण्यात केमिकल कंपनीला भीषण आग

पुणे | पुणे-सातारा महामार्गालगतच्या भागात असलेल्या केमिकल कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. परिणामी सध्या या भागात धावपळ सुरू आहे.

महामार्गालगत असलेल्या कासुर्डी येथील इलेजर सोलटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आग लागल्यानं सध्या आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

सदरील कंपनीमध्ये पेंटीगसाठी वापरण्यात येणारे केमिकल अधिक प्रमाणात असल्यानं आग जास्त भडकली आहे. सध्यातरी कोणतीही जिवितहानीची झालेली नाही.

अग्निशमन दलाच्या गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीचे लोट पुर्ण परिसरात पसरले आहेत.

कसलीही जिवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात कंपनीचं आर्थिक नुकसान झालं आहे. आगीचं कारण अद्यापही समजू शकलं नाही.

आगीची माहिती मिळताच तातडीनं जवळपासच्या सर्व अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहचल्या आहेत. खूप दूरवरून आगीचे लोट पहायला मिळत आहेत.

कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा असल्यानं ठिकठिकाणी आगीचा भडका उडताना पहायला मिळत आहे. परिणामी सध्या परिसरातील सर्वजण चिंता व्यक्त करत आहेत.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवळपास 8-10 गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. मोठ्या प्रमाणात आग विझवण्याचे प्रयत्न चालू आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 येत्या 48 तासांमध्ये ‘या’ भागात उष्णतेची लाट, हवामान खात्याचा गंभीर इशारा

 मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी करा ‘या’ योजनेत गुंतवणूक, मिळतील इतके लाख रूपये

 “पावसात शरद पवार भिजले आणि निमोनिया भाजपला झाला”

कोरोनाच्या चौथ्यालाटेबाबत डॉ. अविनाश भोंडवेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती 

“हिंमत असेल तर काढा दोन्ही कुबड्या आणि लढा स्वबळावर”