कोरोनाने हिरावून घेतली बापाची सावली, आता वडिलांच्या आवडत्या IPL टीमकडून खेळणार

मुंबई | क्रिकेट हा भारतासाठी नव्हे तर जगभरातील कोट्यावधी लोकांसाठी एक महत्त्वाचा खेळ बनत चालला आहे. अशातच भारत हा क्रिकेटची महासत्ता म्हणून सध्या जगात ओळखला जात आहे.

बीसीसीआयच्या माध्यमातून भारतातील क्रिकेटचं नियोजन केलं जातं. बीसीसीआय जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट लीग दरवर्षी आयोजित करत असते. खेळाडूंची लिलाव प्रक्रिया हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

आता यावर्षीच्या 2022 आयपीएलच्या हंगामापूर्वी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया सध्या चालू आहे. जगभरातील 500 हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले आहेत.

लिलावाच्या दुसऱ्या दिवशी भारतीय अंडर-19 विश्वचषक विजेत्या खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लावण्यात आली आहे. जागतिक दर्जाचे गोलंदाज घेण्यासोबतच भारतीय वेगवान युवा गोलंदाज घेण्यावर संघ मालकांनी रस दाखवला आहे.

भारताच्या विजेतेपदासाठी सर्वोत्तम कामगिरी करणारे खेळाडू आता आयपीएल खेळताना पहायला मिळणार आहेत. राजवर्धन हंगर्गेकर या मराठवाड्यातील उस्मानाबादच्या खेळाडूला चेन्नई सुपर किंग्जनं तब्बल 1 कोटी 50 लाख रूपयांना विकत घेतलं आहे.

राजवर्धनसाठी चेन्नई संघात सामिल होणं हा भावनिक क्षण होता. त्याच्या वडिलांचं गेल्या वर्षी कोरोनानं निधन झालं होतं. त्यांचा आवडता संघ देखील चेन्नई होता.

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा राजवर्धनच्या वडिलांचा आवडता क्रिकेटर होता. परिणामी आता राजवर्धन त्याच संघाकडून खेळणार म्हटल्यावर त्याच्या कुटुंबातील सर्वजण भावूक झाले आहेत.

दरम्यान, भारतीय संघाकडून खेळणं हे अंतिम ध्येय असल्याचं राजवर्धननं म्हटलं आहे. जास्तीत जास्त चांगलं प्रदर्शन करण्यावर भर देणार असल्याचं तो म्हणाला आहे.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)


महत्त्वाच्या बातम्या – 

केंद्र सरकारने केला पीएफमध्ये ‘हा’ महत्त्वाचा बदल; लाखो लोकांना होणार फायदा

“…तर मला उदयनराजेंच्या ड्रायव्हरलाच I Love You म्हणावं लागेल”

“…म्हणून अण्णा हजारेंनी वाईन विक्रीला विरोध केलाय”

शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्समध्ये तब्बल ‘इतक्या’ अंकांची घसरण, गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा फटका

“राऊतसाहेब अनिल देशमुखांच्या शेजारची खोली रिकामी आहे, हिंमत असेल तर…”